सातारा

काळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा! कूठे निघालात? मांढरगडावर... अहाे हे वाचा

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असून, मंदिर परिसरात जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मांढरगड सुना सुना पडला आहे. 
 
महिनाभर मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी याठिकाणी भाविकांची वर्दळ असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून यावर्षी काळूबाईची यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पौष महिना म्हणजेच 14 फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ यात्रेच्या मुख्य दिवशी देवीची विधिवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू असून या परिसरात गर्दी होऊ नये याची दक्षता पोलिस व प्रशासन घेत आहे. 

भाविकांनाे.. काळूबाईला येताय, थांबा! मंदिर राहणार महिनाभर बंद

आज पौष पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा झाली. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त ऍड. महेश कुलकर्णी, ऍड. मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित हाेते. यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
 
मांढरगडावर व परिसरात काळूबाई यात्रेच्या निमित्ताने पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक, दहा उपनिरीक्षक, 87 पुरुष, महिला व वाहतूक पोलिस कर्मचारी, 24 होमगार्ड, एक दंगाकाबू पथक, एक जलदकृती दलाची तुकडी असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारीच! चार तासात पार केले 72 किलोमीटरचे सायकलिंग; प्राथमिक शिक्षिकेच्या तंदुरुस्तीचे सर्वत्र कौतुक

औंधमध्ये जमावबंदी; यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

कोविड योद्‌ध्यांच्या गौरवार्थ माजी सैनिकाची सातारा ते रहिमतपूर धाव

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT