Manoj Jarange-Patil meeting in satara maratha reservation police Sakal
सातारा

Satara News : राजधानी साताऱ्यात धडाडणार मनोज जरांगे-पाटलांची तोफ; कधी होणार सभा?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला गुरुवारपासून सातारा जिल्ह्यात सुरुवात होत आहे.

- प्रवीण जाधव

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला गुरुवार (ता. १६) पासून सातारा जिल्ह्यात सुरुवात होत आहे. शनिवारी (ता. १८) सातारा शहरात पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे परवानगी मागण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांचा गुरुवारी जिल्ह्यात दौरा सुरू होणार आहे. त्यांची पहिली सभा मायणी येथे होणार आहे. दुसरी सभा शुक्रवारी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे. शुक्रवारी त्यांचा कराड येथे मुक्काम असणार आहे. शनिवारी ते सातारा मेढा आणि वाई मध्ये सभा घेणार असल्याचा त्यांचा दौरा जाहीर झाला होता.

परंतु सातारा मध्ये सभा होणार का याबाबत संभ्रम होता. सभेच्या नियोजनावरून समन्वयकांमध्ये संभ्रम असल्याने साताऱ्यात बैठक झाली होती. त्यानंतर शनिवार ऐवजी डिसेंबरमध्ये सभा घेण्यात येणार असल्याचे काही समन्वयकांकडून सांगण्यात आले होते. परंतु आज सभेचे नियोजन करणाऱ्या समन्वयकांनी दुपारी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जारांगे पाटील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी अधीक्षकांना सांगितले.

त्यानंतर अधीक्षकांना सभेची परवानगी मागणारे पत्रही देण्यात आले आहे. सायंकाळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासोबत समन्वयकांची बैठक झाली. वंचित बहुजन आघाडी तसेच आपने या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने शनिवारी सकाळी दहा वाजता पोवई नाक्यावर उपस्थित राहावे असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर वायरल करण्यात येत होत्या. त्यामुळे सभेच्या बंदोबस्ताचे पोलिसांनी नियोजन सुरू केले आहे. सातारच्या सभेनंतर मेढा व वाई येथे जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT