Marigold esakal
सातारा

झेंडूच्या कळ्या खुडण्यात शेतकरी व्यस्त; बुध, पुसेगावात बहरल्या बागा

केशव कचरे

बुध (सातारा) : बुध, पुसेगाव महसूल मंडलात ऑगस्टच्या मध्यावर लागवड केलेल्या झेंडूच्या (Marigold) बागा बहरू लागलेल्या आहेत. पावसाने उघडीप देताच कळ्या खुडण्याच्या कामात शेतकरीवर्ग गुंतला असल्याचे चित्र बुध परिसरामध्ये दिसून येत आहे. नवरात्रोत्सव, दसरा व दीपावली जवळ आल्याने फुलांना मागणी वाढणार असल्याने फुले उत्पादक शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

बुध, पुसेगाव महसूल मंडलात ऑगस्टच्या मध्यावर लागवड केलेल्या झेंडूच्या बागा बहरू लागलेल्या आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड झाली असून, सध्या झेंडूच्या फुलांना जेमतेम भाव मिळत असला तरी येत्या दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची फुले भाव खाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी झेंडू लागवडीचा काळ व कोरोनामुळे लॅाकडाउन एकाच वेळी आल्याने वाहतूक, बाजारपेठा बंद, बियाणे आणि चांगल्या प्रतीच्या रोपांचा तुटवडा, लॅाकडाउनबाबतची अनिश्र्चितता यामुळे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी झेंडू पिकाकडे पाठ फिरवली. त्याही परिस्थितीत उत्तर खटाव परिसरातील काटेवाडी, करंजओढा येथील काही शेतकऱ्यांनी धोका पत्करून झेंडूची लागवड केली. त्यांची मात्र चांदी झाली. उत्पादन घटल्याने गेल्या वर्षी झेंडूने शंभरी पार केली.

पारंपरिक शेतीबरोबरच नवनिर्मितीचा ध्यास घेतलेला उत्तर खटाव परिसरातील शेतकरी झेंडू पिकाकडे आकर्षित झाला असून, याही वर्षी झेंडूला चांगला दर मिळेल, या आशेवर काटेवाडी, बुध, करंजओढा येथील शेतकऱ्यांनी ३०७ यलो, ५०७ ईनोव्हा, डीप अॅरेंज, मरिन अॅरेंज, अशोका, अष्टगंधा या जातीच्या झेंडू लागवडीस पसंती दिली आहे. यावर्षी बुध, पुसेगाव व खटाव महसूल मंडलात सुमारे ११५ एकरांवर झेंडू लागवड झाली आहे. लागवडीपासून दीड ते दोन महिन्‍यांत झेंडूचे उत्पादन सुरू होते. ऑगस्टच्या मध्यावर व सप्टेंबरमध्ये लागवड केलेले झेंडूचे पीक बरोबर दसरा व दिवाळी दरम्यान तोडणीस येते. मशागत, रोपे, लागवड, औषध फवारणी, तोडणी, वाहतूक असा एकरी सुमारे एक लाख रुपये लागवडीवर खर्च येतो. योग्य नियोजन व योग्य भाव हे झेंडू फुलशेतीच्या लागवडीचे गमक असून, दर्जेदार उत्पादनास चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील झेंडू लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... संजू सॅमसन IN; आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI

‘कोई मिल गया’ वीण दोघांतली…’मधील कलाकारांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

SCROLL FOR NEXT