सातारा

तीन वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूनंतरही आराेग्य विभागास फुटेना पाझर

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : मारुल तर्फ पाटण येथे दोन दिवसांपासून सुरू झालेली अतिसाराची साथ अद्याप आटोक्‍यात आली नसून आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नव्याने 17 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गावात चोवीस तास साथरोग पथक तैनात केले आहे.
 
कोयना विभागातील मारुल तर्फ पाटण येथे लोकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होत आहे. यामुळे तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तर वैद्यकीय अधिका-यांनी फीट आल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. गावातील लोकांना चोवीस तास आरोग्य सुविधा देण्यासाठी तीन साथरोग पथक गावात तैनात आहेत. 

दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथ आल्याने नळ कनेक्‍शनद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित करून टॅंकरद्वारे पाणीवाटप सुरू आहे. साथ रोखण्यास आरोग्य विभाग शर्थीने प्रयत्न करत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांनी संगितले. 

आरोग्य उपकेंद्राला टाळेच 

मारुल तर्फ पाटण गावात हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राने पाच वर्षांपूर्वी उपकेंद्र सुरू केले आहे. पाच वर्षांपासून विविध कारनाम्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे उपकेंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. आरोग्य विभागाने उपकेंद्राला टाळे ठोकले आहेत. यामुळे उपकेंद्र शोपीस झाले आहे. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वानवा जाणवत असल्याने उपकेंद्र बंद असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी सांगितले. 

पुणे- मुंबईला जाणा-या प्रवाशांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT