Mayor Rohini Shinde esakal
सातारा

कोणीच विचारात घेत नसल्याने राजेंद्र यादवांचा जळफळाट; नगराध्यक्षांची टीका

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या निवडणुका (Karad Municipal Election) जवळ आल्यामुळे शहरातील आघाड्या व पक्ष सक्रिय आहेत; पण राजेंद्र यादव यांच्या आघाडीला काँग्रेस (Nationalist Congress Party), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), लोकशाही आघाडीपैकी (Lokshahi Aghadi) कोणीही अजिबात विचारात घेतलेले नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे. पालिकेतून साडेचार वर्षे गायब असलेल्या राजेंद्र यादव (Rajendra Yadav) यांचा हा राजकीय स्टंटच आहे, अशी टीका नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी केली आहे. (Mayor Rohini Shinde Criticizes Rajendra Yadav Satara Political News)

जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांतर्फे राजेंद्र यादव उद्यापासून पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणास बसणार आहेत.

जनशक्ती आघाडीच्या (Janshakti Aghadi) नगरसेवकांतर्फे राजेंद्र यादव उद्यापासून पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणास बसणार आहे. त्या उपोषणाच्या विरोधात नगराध्यक्षांनी आज टीका केली. नगराध्यक्षा शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साडेचार वर्षे गायब असणारे, पालिकेच्या कोणत्याही बाबतीत सक्रिय नसणारे गटनेते राजेंद्र यादव यांची राजकीय परिस्थिती बरी नाही. त्यामुळे काहीतरी करायचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. त्यामुळेच राजेंद्र यादव माझ्यावर नाहक बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्या आडमुठेपणामुळे अद्याप कऱ्हाड शहराचा अर्थसंकल्प मंजूर झालेला नाही. त्यामधून भाजपच्या नगराध्यक्षांवर आरोप करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकशाही आघाडी यांची सहानुभूती मिळवून त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच अर्थसंकल्पासारख्या (Karad Municipal Budget) अभ्यासपूर्ण विषयावर निष्कारण राजकारण सुरू केले आहे. काहीतरी करतोय असा व्यर्थ व केविलवाणा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.

त्या मानसिकतेतून त्यांनी बेताल आरोप करून उपोषणाचा इशारा दिला आहे. पालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या चार बैठकांत चर्चा होऊन त्यांनी मंजूर केले. स्थायी समितीमध्ये १० पैकी ९ सदस्य जनशक्ती आघडीचे आहेत. त्यांनी मंजूर केलेले अंदाजपत्रक मुख्याधिकारी डाके यांनी सभेपुढे सादर केले होते; परंतु सभा सुरू झाल्यानंतर यांनीच स्थायी समितीमध्ये मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची सूचना आम्हाला मंजूर नाही, अशी भूमिका घेतली. त्यावर राजकीय भाष्य करत काही मुद्दे मांडले; पण लेखी स्वरूपात कोणतीही उपसूचना जनशक्ती आघाडीकडून बैठकीत दिली नाही. त्यांनी चार दिवसांनंतर तयार केलेली उपसूचना सादर केली. तीही पत्रकार परिषदेत. खरे म्हणजे उपसूचना ही लेखी स्वरूपात अंदाजपत्रकाच्या सभेत द्यायला हवी होती. ती दिली गेली नाही. त्यामुळे यादव केवळ राजकीय स्टंट करत आहेत. पालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांचा हा राजकीय स्टंट सुरू आहे.

Mayor Rohini Shinde Criticizes Rajendra Yadav Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT