Dr. Suresh Bhosale esakal
सातारा

'भोसलेंकडे कारखाना आला म्हणूनच 'कृष्णा' वाचला, नाहीतर धुराडे बंद झाले असते'

सकाळ डिजिटल टीम

नेर्ले (सातारा) : अविनाश मोहिते यांच्याकडे कारखाना गेला तर कारखाना (Krishna Co-operative Sugar Factory Election) बंद पडेल, तर डॉ. इंद्रजित मोहिते हे अध्यक्ष झाले तर उसाचे बिल देणार नाहीत, अशी टीका जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे (Jayawantrao Bhosale Co-operation Panel) प्रमुख व ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले (Dr. Suresh Bhosale) यांनी केली. नेर्ले येथील सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ धनगर समाजाने घेतलेल्या बिरोबा मंदिरातील सभेत ते बोलत होते. (Meeting Of Co-operation Panel At Nerle For Krishna Factory Election Satara Political News)

डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे कारखाना आला म्हणूनच कृष्णा वाचला. नाही तर ‘कृष्णा’चे धुराडे बंद झाले असते.

यावेळी ‘कृष्णा’चे माजी संचालक सर्जेराव पाटील, उमेदवार संभाजी पाटील, इंदुमती जाखले, शामराव गावडे, भगवान गडाळे, भानुदास वीरकर, संजय गांधी योजनेचे (Sanjay Gandhi Scheme) अध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच जयकर कदम, दिलीप पाटील, पै. सुनील पाटील, पै. दादासाहेब ताटे, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांनी दहा दहा वर्षे ऊस घातला नाही, ते सभासद क्रियाशील कसे होतील? कृष्णा ट्रस्टबद्दल आक्षेपार्ह टीका करताना हॉस्पिटलने हजारो रुग्णांना जीवदान दिले. हे त्यांनी विसरू नये. ३२ वर्षे झाले कृष्णा हॉस्पिटल (Krishna Hospital) सेवा करते आहे, असे सांगून डॉ. भोसले म्हणाले,‘‘यावर्षी नेर्ले गावाने ९० हजार टन ऊस दिलेला आहे, आता पुढील वर्षी एक लाख टन ऊस नेर्लेने द्यावा. नेर्लेकर जास्त ऊस देतायत. इथे १२०० सभासद आहेत. त्यामुळे भविष्यात कृष्णा कारखान्याचा नेर्लेचा "चेअरमन" होईल, असं वाटतंय.``

उमेदवार संभाजी पाटील म्हणाले, "डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे कारखाना आला म्हणूनच कृष्णा वाचला. नाही तर ‘कृष्णा’चे धुराडे बंद झाले असते. धनगर समाज ज्यांच्यामागे उभा राहतो, ते पॅनेल नक्की निवडून येते.`` या वेळी पै. आनंदराव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, वैभव जाखले, सरगम मुल्ला, शिवाजी गावडे, सर्जेराव चव्हाण, अमोल गुरव, तात्या मोहिते, डी. आर. पाटील, दिनकर मोकाशी, डॉ. एस. व्ही. पाटील उपस्थित होते.

Meeting Of Co-operation Panel At Nerle For Krishna Factory Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT