Vaccination esakal
सातारा

खंडाळ्याला लशीचा पुरेसा साठा द्या; पंचायत समितीत 'ठराव'

लसीकरणाचा वेग धिम्या गतीने सुरू

रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : खंडाळा तालुक्यात ६० टक्के कोविडचे लसीकरण (Covid Vaccination) झाले आहे. लशीच्या पुरेशा उपलब्धतेअभावी दोन-दोन दिवस लसीकरण थांबवावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग धिम्या गतीने सुरू आहे. तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी पुरेशा प्रमाणात लशीचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी करून तसा ठराव खंडाळा पंचायत समितीच्या (Khandala Panchayat committee) मासिक बैठकीत करण्यात आला.

लशीच्या पुरेशा उपलब्धतेअभावी दोन-दोन दिवस लसीकरण थांबवावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग धिम्या गतीने सुरू आहे.

माणदेशी फाउंडेशनने लोणंद येथे तालुक्यातील महिलांसाठी दोन दिवस कोविड लसीकरण शिबिर आयोजित करून तालुक्यातील २ हजार ५२५ महिलांचे लसीकरण केले. त्याबद्दल माणदेशी फाउंडेशन व माणदेशीच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांचे अभिनंदन करून तसा अभिनंदनाचा ठरावही बैठकीत करण्यात आला. सभापती राजेंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आज मासिक बैठक झाली. या वेळी उपसभापती वंदनाताई धायगुडे- पाटील, सदस्य चंद्रकांत यादव, अश्विनीताई पवार उपस्थित होते. सदस्य मकरंद मोटे व शोभाताई जाधव हे बैठकीला अनुपस्थित होते. गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करून चालू सभेपुढील विषयांचे वाचन केले. या वेळी खातेनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या पारगाव- खंडाळा आगाराच्या वतीने विविध मार्गांवर लांब पल्ल्याच्या १८ बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही एकही एसटी बस सुरू केली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

ग्रामीण भागातही पूर्वीप्रमाणे एसटी बसच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी बैठकीत सदस्यांनी केली. सभापती तांबे यांनी खंडाळा- तुळजापूर ही एसटी बस शिरवळमार्गे नेण्यात यावी, असे सांगितले. ग्रामीण भागातही पूर्वीप्रमाणे एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात येतील. डिझेलच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळेही अनेक अडचणी येत असल्याचेही संबंधित अधिकारी यांनी सांगितले. चाचण्यांच्या प्रमाणात केवळ दोन टक्के रुग्ण सापडत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी बैठकीत दिली. उपसभापती वंदनाताई धायगुडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT