Minister Ramdas Athawale esakal
सातारा

PM योजनेतून आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करु; रामदास आठवलेंची ग्वाही

भद्रेश भाटे

पसरणी (सातारा) : राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर आहे. जीवित हानीही झाली आहे. तज्ज्ञांकडून आपत्तीग्रस्त भागाची पाहणी व पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करुन, पंतप्रधान आवास योजनेतून देवरूखवाडी येथील आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी दिले. (Minister Ramdas Athavale Visited Devrukhwadi Kondhavale Village bam92)

आज राज्यमंत्री आठवले यांनी दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या देवरुखवाडी-कोंढावळे गावास भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला.

आज सोमवारी (ता. २६) दुपारी राज्यमंत्री आठवले यांनी दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या देवरुखवाडी-कोंढावळे (Devrukhwadi-Kondhavale Landslide) गावास भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला. पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या त्यांची निवास व्यवस्था शाळा किंवा तात्पुरत्या निवारा शेडमध्ये करण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्य शासनातर्फे ५ लाख व केंद्र शासनातर्फे २ लाख अशी मदत मृतांच्या नातेवाईकांना त्वरित देण्याची सूचनाही त्यांनी केली.

जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोंढावळे येथे आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे व रुग्णवाहिका सेवेबद्दल त्यांनी कौतुक केले. दौऱ्यात रामदास आठवले यांना जांभळी (ता. वाई) ग्रामस्थांनी निवेदन देऊन पुनर्वसनाची मागणी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वप्निल गायकवाड, श्रीकांत निखाळजे, डॉ. तात्यासाहेब जगताप, बाजीगर इनामदार आदी उपस्थित होते.

Minister Ramdas Athavale Visited Devrukhwadi Kondhavale Village bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT