सातारा

जिल्हावासीयांसाठी गृहराज्यमंत्री देसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली 'ही' मागणी!

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खासगी व महापालिकेच्या रुग्णांलयामध्ये, जंबो कोविड फॅसिलिटी सेंटरमध्ये जिल्ह्यातील बाधित रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालये, शासनाने अधिग्रहण केलेल्या खासगी रुग्णालयांत ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरचे मर्यादित बेड आहेत. रुग्णांना आवश्‍यक ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरचे बेड जिल्ह्यातील कार्यरत कोरोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरचे बेड मिळाले नाहीत, म्हणून अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. 

कोरोना रुग्णांचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण पाहता वेळ न लावता जिल्ह्यासाठी जंबो कोविड फॅसिलिटी सेंटर सुरू करण्यास तत्काळ मान्यताही दिली आहे. त्या जंबो कोविड फॅसिलिटी सेंटरच्या कामांस सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, जंबो कोविड फॅसिलिटी सेंटरचे काम पूर्ण होण्यास किमान महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शासनाच्या व मुंबई- पुणे महापालिकांच्या आरोग्य विभागास जिल्ह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी मंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT