crime
crime sakal
सातारा

कऱ्हाड : अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : पालकांचा मुलांसोबतचा तुटणारा संवाद, शॉर्टकटने पैसा कमावणे, त्याच पैशावर मौजमजा करण्यासारख्या सवयींमुळे शहरासह कऱ्हाड तालुक्यातील सुमारे शंभराहून अधिक अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकली आहेत. वर्ष-दीड वर्षात घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, अत्याचार, अपहरणासारख्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचे प्रमाण धक्कादायक आहे. अल्पवयीन मुलांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्याचे आव्हान पोलिस व समाजासमोर आहे.

वयाची १६ वर्षे पूर्ण केलेल्या, तर काही अठराव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असणारी मुलेही गुन्हेगारीकडे आकर्षित झाल्याचे दिसते. त्याचा सामाजिक स्वास्थावरही परिणाम होण्याची भीती आहे. कऱ्हाडच्या उपविभागात शहर, तालुका, उंब्रज व तळबीड आदी पोलिस ठाणी आहेत. त्यातील शहर व उंब्रजमधील लहान मुलांचा गुन्ह्यातील समावेश धोक्याचा आहे. वर्ष-दिड वर्षातील पोलिसांच्या गुन्ह्याच्‍या आलेखात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. उपविभागातील एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत मारामारीपासून खुनापर्यंतच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा नऊ टक्के, शस्त्रासंबंधीच्या गुन्ह्यात ११ टक्के, मारामारीत १४ टक्के, अत्याचाराच्या गुन्ह्यात १५ टक्के, चोरीत २२ टक्के अल्पवयीन मुले विधी संघर्षग्रस्त ठरली आहेत. पोलिसांचा हाच आलेख दीड वर्षातील अल्पवयीन मुलांचा कलही सांगून जातो. अल्पवयीन मुलांना गुन्ह्यातील समावेश विधी संघर्षग्रस्त ठरवत असला तरी त्यांचा गुन्ह्यातील समावेश समाजस्वास्थ्‍याच्या दृष्टीने घातक आहे.

शहरी भागात घरफोडी, खून, चोरीसारख्या गुन्ह्यांत निव्वळ चैनीसाठीच अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील समावेश थक्क करणारा आहे. दीड वर्षापूर्वी १६ दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यात तिघे अल्पवयीन मुले होती. ती वयाच्या १८ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर होती. मात्र, वय पूर्ण न झाल्याने ती विधी संघर्षग्रस्त ठरली.

...अशी आहे आकडेवारी

वर्ष-दीड वर्षात खुनात नऊ, घरफोडीत १८, जबरी चोरीत सात, अपहरणात चार तर अन्य गुन्ह्यात तब्बल २९ लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सगळ्याच स्थितीला सामारे जाताना पोलिसांनाही ही बाब अधिक धक्कादायक ठरत आहे.

गुन्ह्यातील सहभागाची कारणे...

  • चैनीसह मौजमजा करण्याची लागलेली सवय

  • कमी वेळेत जास्त पैसा मिळवण्याची हाव

  • शाळा, महाविद्यालयाबाहेरी वाईट संगत

  • गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्यास

  • पालकांशी असलेला कमी संवाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT