Satara Political News esakal
सातारा

Political News : आता पुन्हा मिठ्या मारणं, पप्प्या घेणं सुरु होईल; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक टोमणा

आता दोन्ही राजे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळं नक्की निवडणूक होणार कशी हा प्रश्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता दोन्ही राजे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळं नक्की निवडणूक होणार कशी हा प्रश्न आहे.

Satara Political News : सातारा नगरपालिकेचा (Satara Municipal Election) 5 वर्षांचा कार्यकाळ संपला असल्याकारणानं आता नगरपालिका निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांत बिगूल वाजणार आहे. मात्र, येऊ घातलेल्या निवडणुकीत साताऱ्यात मोठा पेच उभा राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.

सातारा नगरपालिकेवर सध्या उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता होती. तर, त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची नगरविकास आघाडी विरोधी बाकावर पाहायला मिळाली. मात्र, आता दोन्ही राजे भाजपच्या गोटात आहेत. यामुळं आता नक्की निवडणूक होणार कशी आणि कोणत्या चिन्हावर होणार, हा प्रश्न आहे. त्यातच आता शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraj Bhosale) उदयनराजेंवर (Udayanraje Bhosale) टीका करत आतापासूनच त्यांना घेरण्यास सुरुवात केलीय.

पालिका निवडणूक जशी जवळ येईल, तशी सातारकरांना मिठ्या मारणं, पप्प्या घेणं असे प्रकार पुन्हा पहायला मिळणार आहेत. त्यावेळी सातारकरांना आम्ही कशी पालिका चांगली चालवली हे सांगतील आणि पुन्हा निवडून द्या म्हणतील. परंतु, सध्याच्या मूलभूत प्रश्नांकडं जाणीवपूर्वक सातारा विकास आघाडी आणि त्यांचे नेते लक्ष देत नसल्याची टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार शिवेंद्रराजे माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी उदयनराजेंना टोमणा लगावला. यावेळी त्यांनी साताऱ्याच्या मूलभूत प्रश्नांवरही भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT