Udayanraje Shivendraraje Bhosale met Devendra Fadnavis esakal
सातारा

Karad : वाद चिघळणार! राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला; फडणवीस कोणता घेणार निर्णय?

उपमुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेमंत पवार

खासदार भोसले व आमदार भोसले यांनी स्वतंत्ररित्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कालच्या राड्याची माहिती दिल्याचे समजते.

कराड : सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून काल साताऱ्यात झालेल्या राड्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे वातावरण तंग झाले होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल बुधवारपासून कराड दौऱ्यावर आहेत. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस कराड येथे येऊन त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

सुमारे तासभर स्वतंत्ररित्या झालेल्या या चर्चेत सातारा येथील राड्याची चर्चा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीची जागा माझी आहे, असे म्हणत काल बुधवारी खासदार उदयनराजे यांनी न्यायालयाचा अवमान होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, असे आवाहन पोलिसांना करत खिंडवाडीत भूमिपूजनाच्या ठिकाणी थांबून राहिले.

दरम्यानच्या काळात शिवेंद्रसिंहराजे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जागा मार्केट कमिटीच्या नावावर असल्याचे सांगत उदयनराजे आणि पोलिसांच्या समोरच कार्यक्रमस्थळी नारळ फोडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडून निघून गेले.

यानंतर खासदार भोसले यांनी घटनास्थळी त्यांच्या समर्थकांसमवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर उदयनराजे यांनी संभाजीनगर ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना विविध विकासकामांसाठी जागा नाही. त्यासाठी त्यांनी आम्हाला या जागेची मागणी केली.

त्या जागेत संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठीच्या विविध विकास कामांसाठीचे भूमिपूजन केले. सातारा येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला दोन्ही राजे कराडमध्ये दाखल झाले आहेत.

खासदार भोसले व आमदार भोसले यांनी स्वतंत्ररित्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कालच्या राड्याची माहिती दिल्याचे समजते. या राडा प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

Sattu Buttermilk Recipe: उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला आतून थंडावा देणारं सुपर देसी ड्रिंक! घरच्या घरी झटपट बनवा 'सत्तूचं ताक'

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

SCROLL FOR NEXT