सातारा

नळकनेक्‍शनसाठी कोणाचीही अडवणूक नको, प्राधिकरणला उदयनराजेंच्या सक्त सूचना

उमेश बांबरे

सातारा : कण्हेर पाणीपुरवठा योजनेतून शाहूपुरीसाठी साडे चार हजार कनेक्‍शन्स्‌ मंजूर केली असली तरी सुमारे 12 कोटी रुपयांचा वाढीव निधीही मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त कनेक्‍शनची गरज भासल्यास, सर्वांना कनेक्‍शन देण्याची कार्यवाही प्राधिकारणाने करावी. कोणाचीही अडवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

प्राधिकरणाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांच्याकडून उदयनराजे भोसले यांनी कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, संजय पाटील, माजी सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, प्राधिकारणाच्या कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले तसेच अधिकारी उपस्थित होते. 

उदयनराजे म्हणाले, नागरी पाणीपुरवठा योजनांचा लाभ देताना कोणताही भेदभाव केला जाऊ नये, अशी सर्वमान्य धारणा आहे. शाहूपुरीचा काही भाग आता पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे वाढीव कनेक्‍शन्स्‌ देण्याची कार्यवाही प्राधिकरण व पालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी. शाहूपुरीमधील कोणत्याही कुटुंबाची पाण्याच्या कनेक्‍शनअभावी अडचण होईल, असे कोणतेही कृत्य होणार नाही. याची काळजी प्राधिकरण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. वाढीव निधीतून या योजनेचे काम तातडीने पूर्ण करुन, योजनेचा लाभ देण्यास लवकरात लवकर सुरुवात करावी. मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांनी लवकरच योग्य ती कार्यवाही करुन, नगरपरिषदेच्या सहकार्याने योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT