सातारा

पुण्यातील सातारकरांसाठी उदयनराजेंचा पुढाकार

उमेश बांबरे

सातारा : रेल्वेच्या संदर्भातील सर्व प्रश्‍नांवर तातडीने कार्यवाही केली जाईल. सातारा-पुणे शटल सेवा सुरू करण्यातबाबत पुणे विभाग सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी पुणे येथील बैठकीत दिली. रेल्वेच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांबाबत पुणे येथे नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक झाली.
 
प्रारंभी पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे स्वागत केले. या वेळी उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध समस्या मांडल्या. ते म्हणाले, की रेल्वे लाइनचे दुहेरीकरण करण्यासाठी संपादित होणाऱ्या जमीन मालकांच्या समस्या जाणून घेऊन संपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. भूसंपादनासाठी मंजूर केलेल्या 33 कोटी रुपयांपैकी केवळ एक कोटीचे वाटप झाले आहे. उर्वरित वाटप तातडीने करावे. सातारा- पुणे रेल्वेची शटल सेवा सुरू करावी. जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिटिशांपासून असलेली फाटक पद्धत बंद करून तेथे स्वयंचलित फाटके व नवीन पुलांची उभारणी करावी, यासह रेल्वेसंबंधीचे अनेक प्रश्‍न व त्यावरच्या उपाययोजना त्यांनी नमूद केल्या, तसेच जिल्हा पातळीवर पुणे विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधी यांची 15 दिवसांतून एकदा बैठक बोलावून रेल्वेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गतिमान प्रशासन पद्धत अवलंबावी, अशा सूचना केल्या.

या वेळी खासदार उदयनराजे भोसले, रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा, रेल्वेचे कमर्शियल इंजिनिअरिंग व इतर विभागांतील अधिकारी, भूसंपादन विभागाचे अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, भरतराव माने, रॉबर्ट मोझेस, ऍड. डी. जी. बनकर, संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ, शफीक इनामदार, अजय मोहिते, मनोज सोळंकी आदींसह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

रेणू शर्मा म्हणाल्या, ""खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनांनुसार तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. 15 दिवसांतून एकदा जिल्हास्तरावर चर्चा व्हावी म्हणून बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील. सातारा ते पुणे शटल सेवा सुरू करण्याबाबत पुणे विभाग सकारात्मक आहे.'' लवकरच शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

'या' कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजेंच; काेणी उठविला आवाज वाचा सविस्तर

दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले यांनी रेल्वेचा एक माेठे प्राजेक्ट सातारा जिल्ह्यात आणण्याचा नुकताच निर्धार व्यक्त केला आहे. सातारा पुणे शटल सेवा सुरु झाल्यास पुण्यातील सातारकरांनाही त्याचा लाभ हाेईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले. 

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT