Udayanraje Bhosale esakal
सातारा

सातार्‍यावर मोदींचं विशेष प्रेम; खासदार उदयनराजे पंतप्रधानांना भेटणार

गिरीश चव्हाण

सातारा : शहराचा केंद्राच्‍या स्मार्ट सिटी योजनेत (Smart City Scheme) समावेश होण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना भेटणार असून त्‍याबाबत या कार्यालयाशी चर्चा झाल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाव्‍दारे दिली आहे. पत्रकात म्‍हटले आहे की, जिल्ह्यातील शहरे स्मार्ट बनविण्‍यासाठी आम्ही आग्रही आहोत. केंद्राच्‍या स्वच्छ भारत अभियानामुळे (Swachh Bharat Abhiyan) अनेक गावे ओडीएफ आणि ओडीएफ प्लस होत आहेत. (MP Udayanraje Bhosale Will Meet Prime Minister Narendra Modi To Include Satara In The Smart City Project)

सातार्‍याचा समावेश स्‍मार्टसिटीत व्‍हावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विशेष विनंती करणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

तसेच स्मार्टसिटीसाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना (Smart concept) आणि उपक्रम राबवावे लागतील. या संकल्‍पनांचा फायदा सर्वसामान्‍यांना होईल. सातार्‍याचा समावेश स्‍मार्टसिटीत व्‍हावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विशेष विनंती करणार आहोत. सातार्‍यावर मोदी यांचे विशेष प्रेम असल्‍याचेही त्‍यांनी पत्रकात नमूद केले आहे. जिल्‍ह्यात अकरा धरणे असून अनेक ठिकाणी छोटेमोठे बंधारे, के.टी. वेअर आहेत. भौगालिक परिस्थितीमुळे पश्‍चिमभाग अतिवृष्टीचा आणि पूर्वभाग अवर्षणग्रस्त आहे. याचा विचार करून, पॉटेबल वॉटरचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प सातार्‍यात राबविणेत येणार आहे. त्‍यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन तसा प्रस्‍ताव देखील त्‍यांना देणार असल्‍याचेही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह 'या' 25 प्रश्‍नांची उत्तरं द्या; खासदार उदयनराजेंचं थेट आव्हान

MP Udayanraje Bhosale Will Meet Prime Minister Narendra Modi To Include Satara In The Smart City Project

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT