Satara 
सातारा

दोन तास आला अन्‌ गाव कंटेनमेंट झोन बनवून गेला! एका मुंबईकरामुळे संकट

सकाळ वृत्तसेवा

कास (जि. सातारा) : डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा गावातील आखाडेवस्तीतील एक मुंबईकर रविवारी रात्री नऊच्या सुमारास गावात आला. त्याच रात्री 12 नंतर त्याला त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी ग्रामसेवक व पोलिस पाटलांना दूरध्वनी करून याबाबत कल्पना दिली. त्या रात्री तातडीने स्वतःच्या खासगी वाहनातून त्यांना सर्वसाधारण रुणालयात दाखल झाले. सोमवारी उशिरा त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याने कुसुंबीमुरा गाव कंटेनमेंट झोनमध्ये अडकले गेले. 

हा मुंबईकर गावात फक्त दोन ते तीन तास राहिला. परंतु, गावाला तब्बल 14 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये अडकवून गेला. ही बाब समजताच कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. आनंदराव पाटील, आरोग्य सेवक प्रदीप पार्टे, सोनाली सपकाळ, ग्रामसेवक चंद्रकांत कोळी, तलाठी साळुंखे, पोलिस पाटील एकनाथ सुतार, आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य साधू चिकणे, अंकुश मोरे, जगन्नाथ चिकणे, श्रीकांत चिकणे, ज्ञानेश्वर आखाडे, अंगणवाडी सेविका सीमा आखाडे, आशा सेविका जगिता जंगम यांनी भेट देवून पाहणी केली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या भावाला रायगाव विलगीकरणात दाखल केले असून, गावातील 13 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

इकडे डोंगरमाथ्यावर कोरोना पोचला असताना बामणोली भागातील मुनावळे गावातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली. मुंबईतील भिवंडी येथून दहा जणांचे कुटुंब गावी आले. त्यातील एकाला लक्षणे आढळल्यामुळे त्याला वाटेतच सातारा सर्वसाधारण रुणालयात पाठवले होते. ती 42 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील नऊ जणांना गावातील शाळेत क्वारंटाइन केले होते. त्यांनाही रायगाव येथील विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून, मुनावळे येथील एकूण संख्या सहा झाली आहे. बामणोली आरोग्य केंद्राचे डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी तातडीने सतर्कता दाखवत केलेल्या विलगीकरणामुळे त्यांचा स्थानिक पातळीवर कोणताही संपर्क आला नाही. 


धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय! 

कास, बामणोली परिसरातील दुर्गम गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मुंबईवरून येणाऱ्यांमुळे वाढत असून, प्रशासनासह स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत असल्याने ते हतबल झाले आहे. त्यांची अवस्था "धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय,' अशी झाली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT