सातारा

दोन गटांतील राड्यानंतर संपूर्ण घरात पसरला रक्ताचा सडा

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : पूर्ववैमनस्यात वाळूची ठिणगी पडून झालेल्या वादातून नरवणे (ता. माण) येथे दोन गटांत झालेल्या राड्यात कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसून परस्पर विरोधी गटातील दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत नाथाजी जाधव (वय 45) व विलास धोंडिबा जाधव (वय 55) अशी मृतांची नावे आहेत. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ साताऱ्यात हलविण्यात आले आहे.
 
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, तहसीलदार बाई माने यांनी जप्त केलेल्या पाच ब्रास वाळूचा लिलाव चंद्रकांत जाधव यांनी घेतला होता. मात्र, सत्यवान धोंडिबा जाधव यांनी चंद्रकांत ही वाळू बेकायदेशीर उचलत असल्याची तक्रार तलाठ्यांकडे केली होती. या कारणातून बुधवारी (ता.17) सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन गटांतील वाद विकोपाला जाऊन चंद्रकांत जाधव यांच्या घरात कुऱ्हाड, लोखंडी व लाकडी दांडके व धारदार शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चंद्रकांत जाधवांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी विलास जाधव यांचा दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. घटनास्थळी घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली होती. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पसरलेला होता. स्वयंपाक घरातच रक्ताच्या थारोळ्यात चंद्रकांत जाधव यांचा मृतदेह पडला होता. घराबाहेरील दुचाकी व चारचाकी फोडण्यात आल्या आहेत. रक्ताने बरबटलेली लाकडी दांडकी, लोखंडी नळ्या व कुऱ्हाड तिथेच पडलेली होती.
 
दरम्यान, वाळूबाबत तलाठी यांना फोन का केला, याचा राग मनात धरून सकाळी साडेदहा वाजता मोटारसायकलवरून शेताकडे जाताना चंद्रकांत नाथाजी जाधव, दीपक जाधव (रा. वडजल), तुपे (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य दोन अनोळखींनी मोटारसायकलवरून येऊन मला दमदाटी करत गाडीला लाथ मारून मला खाली पाडले, तसेच हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी व दगडांनी मारहाण करून निघून गेले. याबाबत मी तातडीने फोनवरून ही घटना सांगितल्यावर शिवाजी धोंडीबा जाधव, विलास धोंडीबा जाधव, संभाजी शिवाजी जाधव, विश्वास विलास जाधव, समाधान कृष्णा जाधव यांनी चंद्रकांत नाथाजी जाधव यास त्याच्या घरी जाऊन का मारले, याबाबत विचारणा केली असता पाऊणे अकरा वाजता त्याच्या घरातच व घराबाहेर आम्हा सर्वांना चंद्रकांत नाथाजी जाधव, दीपक जाधव, तुपे व दोन अनोळखींनी शशिकांत नाथाजी जाधव, सूर्यकांत नाथाजी जाधव यांच्यासह सात जणांनी कुऱ्हाड, चाकू, दगड व लाथाबुक्‍क्‍यांनी जखमी केले. या मारहाणीत भाऊ विलास धोंडीबा जाधव (वय 55) यांचा खून केल्याची फिर्याद सत्यवान धोंडीबा जाधव यांनी दिली आहे.

ATM कार्डची अदलाबदली करुन तुमची फसवणुक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधा  

मृत चंद्रकांत जाधव यांच्या भावजय दया सूर्यकांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझे दीर चंद्रकांत नाथाजी जाधव व आमचे कुटुंबाची 2014 मध्ये चुलत दीर विलास धोंडीबा जाधव यांच्या घरातील लोकांबरोबर सामायिक जागेच्या कारणावरून भांडणे झाली होती. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याच्या तारखा दहिवडी येथील न्यायालयात सुरू आहेत. आमची जमीन रामोशी इनाम नावाच्या शिवारामध्ये असून, या जमिनीमध्ये काल माझे दीर चंद्रकांत जाधव यांनी वाळूचा ढीग टाकल्याचे मी पाहिले आहे. त्यावरून ते वाळूचा व्यवसाय करत असल्याचे माहीत झाले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मी घरात असताना भांडणाचा आवाज आला. त्या वेळी विलास धोंडीबा जाधव, सत्यवान धोंडीबा जाधव, कृष्णा धोंडीबा जाधव, विश्वास विलास जाधव, सागर शिवाजी जाधव, जीवन शिवाजी जाधव, समीर कृष्णा जाधव, पांडुरंग विलास जाधव, शिवाजी धोंडीबा जाधव, माधव विलास जाधव हे दीर चंद्रकांत यांना घराच्या दारामध्ये व घरामध्ये कुऱ्हाडीने व लोखंडी पाइपने मारहाण करीत होते. त्यांच्यापैकी सत्यवान जाधव याच्या हातात कुऱ्हाड होती, तर जीवन जाधव याच्या हातामध्ये लोखंडी पाइप होती. इतर सर्व जण हाताने लाथाबुक्‍यानी मारहाण करीत होते. हे लोक निघून गेल्यानंतर मी घरात जाऊन पाहिले असता माझे दीर चंद्रकांत यांचा खून झाल्याचे आढळून आले.
 
दरम्यान, या घटनेने गावात तणावपूर्ण शुकशुकाट होता. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ दाखल झाले होते. गावात पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख व पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची चक्रे सुरू केली आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Fine: वाहतूक दंडाचा मोठा डोंगर, वसूल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान; थक्क करणारी आकडेवारी समोर

T20 World Cup Controversy : भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचा आरोप! ते जास्त शक्ती निर्माण करणाऱ्या बॅटचा वापर करतात...

Pune Police: पुण्यात दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई; चौका-चौकात उभे आहेत पोलिस

Finance Ministry Jobs 2026: खुशखबर! वित्त मंत्रालयाकडून रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी भरती जाहीर, पाहा कोण अर्ज करू शकतात?

Khamgaon Jalna Railway: खामगाव-जालना रेल्वे मार्ग कागदावरच; पुन्हा हुलकावणी महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरतोय दिवास्वप्न

SCROLL FOR NEXT