Ncp esakal
सातारा

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह तिघांवर गुन्हा

त्यावरून माने यांच्याविरुद्ध दोन लाख 40 हजार रुपयांची 120 ब्रास वाळू चोरून नेल्याचा व शासकीय कामात अडथळा आणल्याचा, तसेच ट्रॅक्‍टरचालक व पोकलेन ऑपरेटर यांच्या विरुद्धही फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : अवैधपणे उत्खनन केलेली दोन लाख 40 हजार रुपयांची वाळू मिश्रित माती चोरून नेल्याप्रकरणी व जप्त केलेली वाहने ताब्यात घेण्यास अटकाव करून शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी साखरवाडी (ता. फलटण) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (nationalist congress party) फलटण तालुकाध्यक्ष सतीश माने यांच्यासह तिघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात (phaltan rural police) गुन्हा नोंद झाला आहे. ncp phaltan taluka president satara crime news

याबाबतची माहिती अशी, की 16 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास होळ (ता. फलटण) येथील शेती महामंडळाच्या खंडाने घेतलेल्या जमिनीत वाळू मिश्रित मातीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना मिळाली. तेव्हा त्यांनी होळ येथील मंडलाधिकारी भांगे व होळ व पिंपळवाडी येथील तलाठी सुभाष गवळी यांना माहिती देऊन संबंधित ठिकाणी जाऊन छापा मारून कारवाई करण्यास सांगितले.

त्या वेळी मंडलाधिकारी भांगे, तलाठी गवळी, कोतवाल सतीश धायगुडे व चालक बाळासाहेब भिसे यांनी होळ येथील शेती महामंडळाच्या गट नंबर 274 जमिनीत छापा मारला. त्या वेळी तेथे वाळू मिश्रित मातीचे उत्खनन सुरू होते. कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच तेथील एक ट्रॅक्‍टर भरलेल्या वाळूसह ट्रॉलीसह पळून गेला. तेथील पोकलेन मशिनचा ऑपरेटरही पळून गेला. यानंतर पोकलेनवर नमूद असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता तो नंबर सतीश माने (रा. साखरवाडी) यांचा असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पोकलेनबाबत विचारणा केली असता तो त्यांनी आपले बंधू राजेंद्र माने यांचा असल्याचे सांगितले.

संबंधित ठिकाणी आम्ही शेत तळ्याचे काम करीत असल्याचेही सांगितले. या ठिकाणी वाळू मिश्रित माती काढण्याची व वाहतुकीची परवानगीबाबत विचारले असता माने यांनी काहीही सांगितले नाही. त्यानंतर तेथे उत्खनन केलेल्या जमिनीचा पंचनामा करून पोकलेन फलटण तहसील कार्यालय येथे नेण्याची तयारी करीत असताना सतीश माने यांनी मंडलाधिकारी व तलाठ्यांना तसे करण्यास अटकाव केला. वारंवार धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत तलाठी सुभाष गवळी यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यावरून माने यांच्याविरुद्ध दोन लाख 40 हजार रुपयांची 120 ब्रास वाळू चोरून नेल्याचा व शासकीय कामात अडथळा आणल्याचा, तसेच ट्रॅक्‍टरचालक व पोकलेन ऑपरेटर यांच्या विरुद्धही फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT