सातारा

ग्रामस्थांनाे! 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू; सायंकाळी पाचनंतर घराबाहेर पडू नका

सिद्धार्थ लाटकर

सातारा : खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ व लोणंद या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी  मनिषा आव्हाळे यांनी शिरवळ व लोणंद या भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ही संचारबंदी दाेन टप्प्यात असणार आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

सातारा जिल्ह्यातील मंगळवारी रात्री खंडाळा तालुक्यात काेविड रुग्णांमध्ये शिरवळ 6, मिरजे  6, लोणंद 9, खंडाळा 5, बावडा 1,  अहिरे 1, घाटदरे 1,  सांगवी 2 असे वाढले. परिणामी वाढती रुग्ण संख्या राेखण्यासाठी तसेच साखळी ताेडण्यासाठी दाेन टप्प्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नव्या आदेशात खंडाळा तालुक्‍यातील हॉटेल्स, खाद्यगृह , दुकाने या ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांना प्रवेश द्यावा. संबंधित ठिकाणी प्रवेश देताना मास्कचा वापर अनिवार्य असेल. मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर पाचशे रुपये दंड आकारण्यात करण्यात येईल. दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकांना सहा फुटाचे अंतर राखणे बंधनकारक राहील. तसेच एंट्री आणि एक्‍झीट पॉईंटवर थर्मल स्कॅनिंग , हॅण्डवॉश , सॅनिटायझर यांची व्यवस्था करावी असे नमूद करण्यात आली आहे. 

ही संचारबंदी संध्यकाळी पाच ते रात्री नऊ आणि सकाळी सहा वाजल्यासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ नागरिकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेतच बाजारपेठ, कार्यालय सुरु राहतील. या संचारबंदीच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही संचारबंदी 31 मार्च 2021 पर्यंत असणार आहे असे आव्हाळे यांनी आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनूसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT