Selfie sakal
सातारा

Satara News : महाबळेश्वरमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून नवविवाहितेचा मृत्यू

पर्यटकांची नेहमीच पसंती असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर नेहमीच येत असतात.

Ajinkya Dhayagude

महाबळेश्वर : पर्यटकांची नेहमीच पसंती असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उस्मानाबाद धाराशिव येथील अंकिता गुरव आपल्या पतीसह महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. महाबळेश्वरमधील केट्स पॉईंटवर सेल्फी घेत असताना तोल जाऊन त्या खोल दरीत कोसळल्या. पत्नी दरीत कोसळल्याची माहिती पतीने स्थानिक दुकानदारांच्या मदतीने पोलिसांना दिली.

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले, महिला जवळ पास सहाशे फूट खोल दरीत कोसळली असल्याने तब्बल दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर त्या महिलेला वर काढण्यात आले. वर काढल्यानांतर ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समजले.

अंकिता गुरव आणि त्यांचे पती पुण्यात वास्तव्यास असल्याचे समजले आहे. पती रेल्वेमध्ये नोकरीला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस करीत असून मृतदेहाचे महाबळेश्वर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

घाट माथ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपली काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेणं आवश्यक आहे. पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन महाबळेश्वर मधील विविध निसर्गरम्य ठिकाणे पाहावीत, सेल्फी काढण्यासाठी पॉईंट्सच्या टोकाला जाणे पर्यटकांनी टाळले पाहिजेत असे स्थानिकांकडून आणि प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT