सातारा

मुंबई -पंढरपूर प्रवासात हरविलेले पैशांचे पाकीट मिळाल्याने प्रवासी सुखावला

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे उदाहरण नुकतेच फलटण एसटी आगारामध्ये समोर आले आहे. एक प्रवाशाने एसटीत सापडलेले पाकीट प्रामाणिकपणे आगारात आणून दिले आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई-पंढरपूर या बसने प्रवास करणारे प्रवासी नीलेश इथापे यांना बसमध्ये एका प्रवाशाचे पैशाचे पाकीट व कागदपत्रे प्रवासात पडलेले सापडले. त्यामध्ये चार हजार 600 रुपये होते. मात्र, श्री. इथापे यांनी हे पाकीट प्रामाणिकपणे फलटण स्थानकप्रमुख कार्यालयात वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर यांच्याकडे जमा केले.

हीच ती वेळ : सातारा पालिका जिंकू शकते हद्दवाढीतील नागरिकांचा विश्वास

श्री. इथापे हे मुंबई येथे न्यू मुंबई बस ट्रान्स्पोर्टच्या सिटी बसवर वाहक म्हणून काम करतात. सापडलेले पाकीट श्री. कदम यांचे असल्याचे समजले आहे. श्री. इथापे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल फलटण आगार प्रशासनातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी सहायक वाहतूक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, चालक मंगेश शिर्के, वाहक आय्याज शेख व प्रवासी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT