NMMS-Exam sakal
सातारा

एनएमएमएस परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात

परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे २०२१-२२ या वर्षातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १० एप्रिलला होणार असून, १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्याही शासकीय अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेत आठवीत शिकत असलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे, तसेच सातवीत सर्वसाधारण संवर्गासाठी किमान ५५ टक्के उत्तीर्ण व आरक्षित संवर्गासाठी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतो.

या परीक्षेसाठी १९ जानेवारीपासून https://www.mscepune.in किंवा https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत असून, ऑनलाइन विलंब अर्ज दाखल करण्याची मुदत २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT