Onion Crop esakal
सातारा

खटावात कांदा काढणीसाठी कोणी मजूर देता का मजूर?; शेतकऱ्यांची आर्त साद

सातारा जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे तालुके म्हणून खटाव, माणची ओळख आहे.

केशव कचरे

बुध (सातारा) : शेतीकामे करण्यासाठी शासनाने सवलत दिली असली तरी नागरिकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने महिला मजूर घराबाहेर पडत नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसत असून उत्तर खटाव (North Khatav) परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतात मजूर मिळत नसल्याने कांदा काढणीवाचून (Onion Crop) तसाच पडून आहे. (No Labor Was Available For Onion Harvesting In North Khatav Satara News)

जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे तालुके म्हणून खटाव, माणची ओळख आहे. मात्र, बियाणाच्या तुटवड्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन्ही तालुक्‍यांत कांदा लागवड कमी झाली. रब्बी हंगामात लागवड केलेला कांदा सध्या काढणीस आला आहे. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावोगावी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गावागावांत नागरिकांनी पुढाकार घेऊन गावे सील केली आहेत. त्यामुळे मजुरांना घराबाहेर पडणे अशक्‍य झाले आहे.

कांदा उत्पादनात उत्तर खटाव परिसर प्रसिध्द आहे. बुध, राजापूर, रणसिंगवाडी येथील अनेक महिला मजुरांच्या टोळ्या दरवर्षी एकरावर मजुरी ठरवून शेतकऱ्यांची कांदा लागवडीची व काढणीची कामे करतात. मात्र, यंदा गावोगावी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने कोरोनाच्या भीतीपोटी मजूर घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. परिणामी, मजुरांची मोठी चणचण भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कुटुंबातील व्यक्तींनाच सोबत घेऊन कांदा काढणीसाठी सुरवात केली आहे.

No Labor Was Available For Onion Harvesting In North Khatav Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... संजू सॅमसन IN; आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI

‘कोई मिल गया’ वीण दोघांतली…’मधील कलाकारांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

SCROLL FOR NEXT