सातारा

अकरावी प्रवेशात हलगर्जीपणा; महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

Balkrishna Madhale

सातारा : माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रकियेमधील हलगर्जीपणाबाबत शाळा व महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सध्या शाळा महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयास भेट देऊन प्रवेश प्रक्रियेची पाहणी केली.

त्यामुळे दिलेल्या सूचनेनुसार ११ वी प्रवेश न राबविण्याचे नेमके कारण काय, प्रवेश प्रक्रियेवर कोणतही सनियंत्रण नाही, प्रवेशासाठी प्राप्त अर्जावरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली नाही, ती यादी प्रसिध्द केली नाही, अशी यादी विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करुन न देण्याचे कारण काय, अकरावी प्रवेश प्रक्रियेची समाजमाध्यमांव्दारे व वेबसाइटव्दारे पुरेशी माहिती व प्रसिध्दी न करणे, मदतकक्ष, दिव्यांगाची व्यवस्था का केली गेली नाही.

शुल्क निश्चितीसाठी शिक्षक पालक संघाचे इतिवृत्ताबाबत कार्यवाही न करण्याचा नेमका हेतू काय, याबाबत शाळा, महाविद्यालयांना नोटिसा काढल्या आहेत. या मुद्याचा खुलासा माध्यमिक शिक्षण विभागास पुराव्यासहित सादर करावा. खुलासा वेळेत न आल्यास अथवा असमाधानकारक असल्यास एमईपीएस नियम १९८१ नुसार पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी नोटिसीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT