सातारा

जाणून घ्या महावितरणचा व्हॉट्‌सऍप क्रमांक; घरुनच नोंदवा विजेबाबतच्या तक्रारी

उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीज तारा तुटणे, जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणने नागरिकांना मोबाईल व्हॉटस्‌ऍपचे नवे माध्यम उपलब्ध केले आहे.
...अन्‌ सर्कशीत हसवणारा विदूषक गहिवरला!
 
महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून, व्हॉटस्‌ऍपद्वारे प्राप्त झालेल्या फोटो, माहिती व तक्रारींनुसार वीज यंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी, तसेच संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यासाठी 7875768554 हा व्हॉटस्‌ऍप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती व तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. 

बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी!

या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी कॉल करू नये. फक्त व्हॉट्‌सऍपद्वारे माहिती द्यावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या नागरिकांकडे व्हॉट्‌सऍप नाहीत, त्यांनी "एसएमएस'द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. व्हॉट्‌सऍपद्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

बापरे! कास पठार परिसरात घाेंगावताेय काेराेना 

उंब्रज भागातील विशी-तिशीतील 'या' तीन तालुक्यांतून तडीपार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT