Obstruction of tax recovery due to political interference satara Municipality
Obstruction of tax recovery due to political interference satara Municipality esakal
सातारा

सातारा : पाच हजार मिळकतींवर बोजा?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : तीन महिने प्रयत्‍न करूनही नगरपालिकेस एकूण थकबाकीपैकी फक्‍त १८ कोटी ५० लाखांचीच (३२ टक्के) वसुली करण्‍यात यश आले आहे. नोटिसा बजावूनही शहरातील अनेक मिळकतधारकांनी थकबाकी भरण्‍याचे टाळल्‍याने त्‍याचा आर्थिक ताण पालिकेवर आला आहे. हा ताण कमी करण्‍यासाठी तसेच तिजोरीबाहेरील ३५ कोटी वसूल करण्‍यासाठी पालिकेने थकबाकीदारांच्‍या मिळकतींवर बोजा चढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्‍या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी पालिका जिल्‍हाधिकारी तसेच भूमिअभिलेख कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवणार आहे.

सातारा शहरातील मिळकतींना तसेच मिळकतधारकांना पालिकेच्‍या वतीने विविध सेवा पुरविण्‍यात येतात. यापोटी पालिका त्‍या मिळकतधारकांकडून पालिका घरपट्टी व इतर करांची आकारणी करते. आकारलेले कर मुदतीत मिळकतधारकांनी जमा करावेत, यासाठी पालिका संबंधितांना नोटिसा बजावते. या नोटिसा बजावूनही अनेक जण करांचा भरणा करण्‍यास टाळाटाळ करतात. कर न भरणाऱ्यांमुळे उत्‍पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालण्‍यासाठी पालिकेस शासनाकडून उपलब्‍ध होणाऱ्या विविध अनुदानांवर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी सातारा पालिकेची हद्दवाढ झाली आणि शाहूपुरी, विलासपूर या दोन पूर्ण ग्रामपंचायती आणि इतर उपनगरे व त्‍यालगतचा भाग पालिकेत आला.

या भागांच्‍या समावेशामुळे सुमारे ६० हजार लोकसंख्‍या आणि २० हजारांहून अधिक मिळकती पालिकेच्‍या दप्‍तरावर आल्‍या. मूळ शहर आणि विस्‍तारित भागातील सुमारे ३२ हजार मिळकतधारकांकडून पालिकेस ५२ कोटी ६६ लाख रुपयांची येणे बाकी होती. ही बाकी वसूल करण्‍यासाठी पालिकेने संबंधितांना नोटिसा बजावत करांची वसुली सुरू केली. त्यासाठी नेमलेल्‍या तीन पथकांच्‍या एकत्रित कामगिरीमुळे पालिकेस मार्चअखेरीस १८ कोटी ५० लाख रुपये वसूल करता आले. एकूण थकबाकीपैकी ३२ टक्केच वसुली झाल्‍याने पालिकेचा ताळेबंद गोत्‍यात आला. वारंवार सूचना, नोटिसा बजावूनही थकबाकी न भरणाऱ्यांच्‍या मिळकतींवर बोजा चढविण्‍याचा निर्णय पालिकेने नुकताच घेतला आहे.

यानुसार पहिल्‍या टप्‍प्‍यात ५ हजार मिळकतींवर बोजा चढविला जावू शकतो. या प्रक्रियेदरम्‍यान तांत्रिक वाद निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. हे टाळण्‍यासाठी त्‍याबाबतचे मार्गदर्शन जिल्‍हाधिकारी शेखर सिंह तसेच भूमिअभिलेख विभागाकडून मागविण्‍याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हे मार्गदर्शन मिळाल्‍यानंतरच मिळकतींवर पालिकेचा बोजा चढविण्‍यासाठीची प्रत्‍यक्ष कार्यवाही करण्‍यात येणार आहे.

राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीत अडथळा

शहरातील अनेक मिळकतदार आर्थि‍कदृष्‍ट्या सक्षम आहेत. यापैकी काही मिळकतधारकांकडून ५ ते ५० लाख रुपयांपर्यंतची येणे बाकी पालिकेस आहे. या वसुलीसाठीची प्रक्रिया पालिका पार पाडते. मात्र, त्‍यात अनेकदा राजकीय हस्‍तक्षेप आडवा येतो. या हस्‍तक्षेपामुळे वसुली रखडली जावून त्‍याचा परिणाम पालिकेच्‍या कारभारावर होत असल्‍याचे अनेक कर्मचारी नेहमी बोलत असतात.

अनेक मिळकतींवर बोजा चढविताना क्‍लि‍ष्‍ट बाबी निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. त्यासाठी त्‍या प्रक्रियेच्‍या अनुषंगाने मार्गदर्शन मागविण्‍यात येत आहे. यानंतर त्‍यासाठीचा सखोल अभ्‍यास करत बोजा चढविण्‍याचे प्रस्‍ताव पालिकेच्‍या वतीने भूमिअभिलेख कार्यालयास सादर करण्‍यात येणार आहेत.

- प्रशांत खटावकर, वसुली निरीक्षक, सातारा पालिका

-गिरीश चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT