Odd-Even Parking esakal
सातारा

मेढ्यात सम-विषम पार्किंगच्या अंमलबजावणीला सुरुवात!

कुडाळ मार्गावर सम-विषम तारखेला असणार एकेरी वाहतूक

सकाळ डिजिटल टीम

मेढा (सातारा) : जावली तालुक्याची (Jawali Taluka) मुख्य बाजारपेठ असलेल्या मेढा शहरात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेची वर्दळ कमी करण्यासाठी मेढ्यात (Medha) सम-विषम (Odd-Even Parking) तारखांना एकेरी पार्किंग सुविधा करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला.

मेढा हे जावली तालुक्याचे मुख्यालय असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर असते.

मेढा हे जावली तालुक्याचे मुख्यालय असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर असते. परिणामी, मेढा शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी असते. यामुळे मेढ्यात वाहनांच्या पार्किंगची समस्या नेहमीच निर्माण व्हायची. नागरिक कुठेही आपले वाहने पार्क करत असतं, त्यामुळे गर्दी तसेच वाहतूक कोंडीच्या समस्या वारंवार शहरात निर्माण व्हायच्या. यावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सम आणि विषम तारखेला एकेरी पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर सर्व वाहनांसाठी सम-विषम तारखेला एकेरी वाहतूक असणार आहे. कुडाळ रस्त्याला सम-विषम तारखेला एकेरी वाहतूक असणार आहे. तसेच बाजारचौक व कोयना हॉटेल ते तहसीलदार कार्यालयाच्या दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर सम-विषम तारखेला फक्त दुचाकींची एकेरी वाहतूक असणार आहे.

सम-विषम पार्किंग व्यवस्थेची सुरुवात मंगळवार १० ऑगस्ट पासून सुरू झाली असून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी टोम्पे व मेढ्याचे सपोनि अमोल माने यांनी सांगितले. या बैठकीसाठी तहसीलदार राजेंद्र पोळ, सपोनि अमोल माने, मेढा नगरपंचायत मुख्याधिकारी अमोल पवार, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, नगरसेवक विकास देशपांडे, शशिकांत गुरव, तलाठी रामचंद्र सावंत, व्यापारी संघटनेचे शरद गांधी, संतोष वारागडे, रफिक शेख, गणेश जवळ, फारुख शेख, रामचंद्र गोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazil vs Norway : ब्राझील वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर! Erling Haaland चे दोन भन्नाट गोल अन् नॉर्वेकडून १९९८ सालची पुनरावृत्ती...

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

SCROLL FOR NEXT