सातारा

कऱ्हाडात बेड न मिळाल्याने एकाचा उपचाराअभावी मृत्यू

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : अपघातात जखमी झालेल्या वडील व मुलांस विटा येथे कोणत्याच रुग्णालयात जागा नसल्याने त्यांना कऱ्हाडला आणण्यात आले. येथेही रात्रभर फिरल्यानंतरही त्यांना बेड मिळाला नाही. त्यातील वडिलांचा काल उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यांच्या 15 वर्षाच्या मुलास कृष्णा रूग्णालयात उपाचारास रात्री दाखल केले. विटा परिसरात काल दुपारनंतर अपघात झाला होता. 

विटा परिसरात झालेल्या अपघातात नाथा शिवाजी कदम (वय 40, रा. धानवड, ता. खानापूर जि. सांगली) व त्यांचा मुलगा जय (13) जखमी झाले होते. दोघांनाही मार लागला होता. त्यातील नाथा यांच्या डोक्‍याला इजा झाली होती. कोरोनामुळे विटा परिसरात फिरून रूग्णालय मिळत नसल्याने त्यांच्यावर उपचार होणार नाहीत, अशी स्थिती दिसताच त्यांना त्वरित त्यांच्या आप्तस्वकीयांनी उपचारासाठी कऱ्हाडला आणले. येथे आल्यानंतरही त्याच स्थितीशी सामना कारावा लागला. येथील त्यांच्या परिचयाचे जावेद नायकवडी यांनी सोशल मीडियावर रूग्णालय उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांना रूग्णालय मिळावे, यासाठी धडपड सुरू झाली. 

मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या दोघांना रूग्णालय उपलब्ध होवू शकले नाही. दोघेही रूग्णवाहिकेत होते. त्यात नाथा कदम यांच्या डोक्‍याला मार लागल्याने काही वेळानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या मुलाला अखेर रात्री उशिरा कृष्णामध्ये बेड मिळाल्याने त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत. मात्र, कऱ्हाड, विटा येथील कोणत्याच रूग्णालयात नाथा कदम यांना उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी त्यांचे निधन झाल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे.   

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

SCROLL FOR NEXT