One hundred corona patients in 24 hours in Satara district 
सातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शंभरीपार

जिल्ह्यात फलटण, सातारा, कऱ्हाड तालुक्यांत वाढले रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

सातारा - जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आज एकूण ११४ जण बाधित आढळून आले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच जिल्ह्यात ध्या ३२५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

फलटण, सातारा, कऱ्हाड तालुक्यांत वाढती बाधितांची संख्या चिंताजनक आहे. मागील महिनाभरापूर्वी दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण आढळून येत होते. कऱ्हाड तालुका १३, जावळी- ७, खंडाळा- ४, खटाव- ६, कोरेगाव- १३, माण- ८, फलटण- २०, सातारा- ३०, वाई- ९, पाटण- १, महाबळेश्वर तालुका एक व इतर एक असे एकूण ११४ बाधित आढळून आले आहेत.

सध्या थंडी, ताप, खोकला, डेंगीचे रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार घेऊन आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत समुद्राला उधाण, किनारपट्टी भागात उंच लाटा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

SCROLL FOR NEXT