Corona Vaccine esakal
सातारा

धक्कादायक! 'कोरोना लस' घेतल्यानंतर रेठऱ्यात एकाचा मृत्यू; आरोग्य विभागाकडून 'खुलासा'

रेठरे बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोनाची लस देण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार काल (शुक्रवारी) दुपारी रेठरे बुद्रुक येथे घडला. संपत राजाराम जाधव (वय 60) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. श्री. जाधव यांना कोरोना लस घेतल्यानंतर त्रास झाला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : रेठरे बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोनाची लस देण्यात येत आहे. काल जाधव यांनी दुपारी तीनच्या सुमारास कोरोनाची लस घेतली. ती लस घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास सुरू झाला. त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना त्वरित कृष्णा रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली झाल्या. श्री. जाधव यांना कृष्णा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. वैद्यकीय सूत्रांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर यंत्रणेचीही खळबळ उडाली आहे. त्याबाबत तालुका पोलिसात सायंकाळी उशिरा कोरोनाची लस घेतल्यानंतर श्री. जाधव यांचा आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. श्री. जाधव यांच्या मृत्यूबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, ""रेठरे बुद्रुक येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल मागविला आहे. रेठऱ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल येईल. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. या मृत्यूची आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही सखोल चौकशी होईल. त्यामुळे त्याबाबत काही बोलणे योग्य नाही.''

आरोग्य विभागाकडून 'खुलासा'

कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील संपत राजाराम जाधव (वय ५९) यांचा कोविड लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. त्यांचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात कऱ्हाडात करण्यात आले असून शवविच्छेदनामध्ये आढळलेल्या पुराव्यानुसार, सदर मृत्यू लसीकरणाशी निघडीत कारणामुळे झालेला नाही. तसचे, त्या व्यक्तीस उच्च रक्तदाबामुळे हृदयावरील ताण वाढून हृदयाचा आकर मोठा झाल्याने मृत्यू झाल्याचे अनुमान शवविच्छेदन पथकाकडून काढण्यात आलेले आहे.

-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक सातारा

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT