सातारा

कऱ्हाडला इतिवृत्त प्रकरणाची चौकशी; ऑडिओ रेकॉर्डिंगसह चर्चेच्या नोंदीची होणार पडताळणी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील पालिकेच्या सात महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सभेच्या अपूर्ण इतिवृत्त प्रकरणावर दै. "सकाळ'ने दणका देताच त्या प्रकरणाची मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. त्यात त्यावेळी सभेत झालेली चर्चा, मिटिंग नोटस्‌, ऑडिओ रेकॉर्डिंगसह अन्य नोंदींचीही चौकशी होणार आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या म्हणण्यानुसार सभेत झालेले ठराव बदलले आहेत का, फेब्रुवारीच्या सभेत चर्चा झाली त्यानुसारच प्रशासनातर्फे ठराव देण्यात आले आहेत का, याची सखोल चौकशी होणार आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठरावात बदल केला आहे, अशा आक्षेपांची चौकशी होणार आहे. 

कऱ्हाड पालिकेच्या सात महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मासिक सभेच्या रखडलेल्या इतिवृत्ताने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यात नगराध्यक्षांसह तत्कालीन मुख्याधिकारी, सभेचे लिपिक व जबाबदार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नगराध्यक्षांचे या इतिवृत्तावर आक्षेप असतील तर ते त्यांनी नोंदवून इतिवृत्त पूर्ण करणे अपेक्षित आहे, अशी भूमिका जनशक्ती, लोकशाही आघाडीने घेतली आहे. त्यावरही कायदेशीर काय करता येईल, याचीही चौकशी मुख्याधिकाऱ्यांतर्फे होणार आहे. 

पालिकेच्या सात महिन्यांपूर्वी झालेल्या सभेनंतर सोमवारी (ता. 21) ऑनलाइन सभा झाली. त्यात पालिकेच्या फेब्रुवारीतील सभेच्या अपूर्ण इतिवृत्तावरून खडाजंगी झाली. इतिवृत्त अपूर्ण असल्यावरून नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना सभेत धारेवर धरले गेले. फेब्रुवारीच्या सभेतील इतिवृत्त अपूर्ण असल्याचे कारण सांगताना नगराध्यक्षा शिंदे यांनी त्या सभेतील काही ठराव तत्कालीन मुख्याधिकारी यांनी बदलले आहेत, असे स्पष्ट करत अशा परस्पर बदललेल्या ठरावावर सही करायची का, असे उत्तर दिल्याने खडाजंगी वाढली. त्यामुळे अपूर्ण इतिवृत्ताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यावर "सकाळ'ने प्रकाश टाकल्यानंतर आता त्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. 

कारवाईची शक्‍यता! 
नगराध्यक्षा म्हणतात त्याप्रमाणे ठरावात बदल केला असेल तर प्रशासनाकडून ठरवाच्या नोंदी ठेवणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मुख्याधिकाऱ्यांबाबत काही कारवाई होऊ शकते का, याची माहिती घेऊन ठरविण्यात येणार आहे. सभेतील चर्चेप्रमाणे जर ठराव प्रशासनाने दिले असतील, तर नगराध्यक्षा शिंदे अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे त्यातील उत्सुकता वाढली आहे. 

याची होणार चौकशी 

- सभेतील झालेल्या चर्चेच्या सविस्तर नोंदी 
- सभा लिपिकाने ठेवलेल्या मिटिंग नोट्‌स 
- सभेतील उपलब्ध असल्यास ऑडिओ रेकॉर्डिंग 
- सभेचे उपलब्ध असल्यास व्हिडिओ चित्रीकरण 
- नगराध्यक्षांच्या म्हणण्यानुसार ठरावात बदल झाला आहे का? 
- सभेत चर्चा झाली तेच ठराव प्रशासनाने दिले आहे का? 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT