Banbihari Nimbkar esakal
सातारा

पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी निंबकर यांचं निधन

संजय जामदार

कोळकी (सातारा) : भारतीय शेती क्षेत्रामधील प्रथम संशोधक, पद्मश्री पुरस्कार (Padmashri Award) विजेते बनबिहारी विष्णू निंबकर (Banbihari Nimbkar) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांचे पार्थिव फलटणातील (निंबकर भवन, जिंती नाका) या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेय. त्यांच्या पश्चात नंदिनी निंबकर, मंजिरी निंबकर व चंदा निंबकर या तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

बनबिहारी यांनी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विशेष योगदान दिलं.

बनबिहारी यांनी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Nimbkar Agriculture Research Institute) माध्यमातून शेती क्षेत्रात विशेष योगदान दिलं. त्यांचे शेती बियाणे व शेळी मेंढी पालन या व्यवसायामध्येही विशेष योगदान होते. त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना भारत सरकारनं सन 2006 रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तसेच 2016 रोजी जमनालाल बजाज अॅवाॅर्ड पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं.

बनबिहारी यांचा जन्म १७ जुलै १९३१ रोजी गोवा येथे झाला, तर १९५६ साली फलटणात त्यांनी शेती बियाणांमध्ये संशोधन करून 'निंबकर सिडस्' (Nimbkar Seeds) नावाने बाजारात आणले. १९६८ रोजी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचीही (नारी) त्यांनी स्थापना केलीय. त्यांच्या या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT