सातारा

व्यापाऱ्यांनीच ठरवलं... आता पाच दिवस बंद पाळायचा; काेणत्या शहरात वाचा

सुनील कांबळे

भिलार (जि.सातारा) : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पाचगणीकरांचा जीव टांगणीला लागला असून, शहरात घबराट पसरली आहे. त्यामुळे आज (मंगळवार) व्यापाऱ्यांची बैठक होऊन उद्यापासून (बुधवार) पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवण्यात आले आहे.
केशरी कार्डधारकांसाठी शासनाने घेतला 'हा' निर्णय 

 गोडवली येथील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा पाचगणीत व्यवसाय असून, लॉकडाउनपासून त्याने भाजीविक्रीचा व्यवसाय केला आहे. अचानक त्याचे निधन झाले. त्यामुळे काल त्याच्या निकट सहवासातील घरातील चौघांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे या 52 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांमध्ये धास्ती पसरली आहे. 

आज सकाळी व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. यामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व गोडवली- पाचगणी येथे नव्याने कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने व्यापारी असोसिएशन, भाजी विक्रेते आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उद्यापासून रविवारपर्यंत पाच दिवस पाचगणित जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.
 
या लॉकडाउनमधून मेडिकल व दूध या अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व नागरिकांनी त्याचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. उद्यापासून पाच दिवस पाचगणी बंद राहणार असल्याने बाजारपेठेत भाजी, किराणा व इतर जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी आज सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. 

कोरोनाचा प्रादुर्भाव पाचगणी टेबल लॅंडच्या कुशीत वसलेल्या गोडवली गावात झाला. मात्र, धास्ती पाचगणीकरांना लागली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी पाचगणीकरांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन घोषित केल्याने सर्व व्यवहार पाच दिवस बंद राहणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT