सातारा

बेफिकीर पर्यटकांना पाचगणी पालिकेचा दणका; दोन लाखांचा दंड वसूल

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : कोरोना संसर्गामुळे तब्बल आठ महिने सुरू ठेवलेला लॉकडाउन अनलॉक करून शासनाने पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी सशर्त परवानगी दिलेली असताना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचगणी पालिकेने पर्यटकांकडून दोन लाख रुपये वसूल केले आहेत.
 
पाचगणी हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे शासनाची परवानगी मिळताच बऱ्याच पर्यटकांनी पर्यटनासाठी पाचगणीत गर्दी केली. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, हॉटेलमध्ये निवासासाठी अनेक निर्बंध घातल्याने या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पालिकेची "टीम' या पर्यटकांवर नजर ठेऊन आहे. अशा उल्लंघन केलेल्या पर्यटकांकडून एका महिन्यात पालिकेने तब्बल दोन लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. 

कऱ्हाडात प्रथमच आरटीओ एजंटावर सांगलीच्या एसीबीची कारवाई

दंड वसूल व्हावा, यासाठी नव्हे तर शासनाने दिलेल्या नियमांचे पर्यटकांनी पालन करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पाचगणी शहरात टेबल, पारशी, सिग्णे असे पॉइंट असून, या पर्यटनस्थळांना आवर्जून पर्यटक भेटी देतात. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनावेळी गर्दी होऊ नये व नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पालिका दक्ष आहे. या दंडामुळे पर्यटकांनी पालिकेच्या "टीम'ची धास्ती घेतली आहे. पर्यटकांनी. शासनाच्या नियमांचे पालन करूनच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन या वेळी मुख्याधिकारी श्री. दापकेकर यांनी केले.

ठेकेदाराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय ; कोल्हापूर जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT