Farmer
Farmer Sakal
सातारा

सातारा : पाटणला खरिपाची लगबग

सकाळ वृत्तसेवा

पाटण - मॉन्सूनचा पाऊस यावर्षी लवकरच हजेरी लावणार आहे, असे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात खरीपपूर्व व ऊस लागणीसाठी आंतरमशागतीच्‍या कामांची लगबग सुरू आहे. उन्हाळी भुईमूग काढणीस सुरुवात झाली असून लग्नसराई व खरीपपूर्व मशागतीची कामे यामुळे बळिराजाची धावपळ उडाली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मका व गहू काढणी पूर्णत्वाकडे गेली आहे. रब्बी हंगामातील व ऊस पिकांची रिकाम्या शेतांची खरीप हंगामासाठी नांगरणी व कुळवणीची कामे सध्या सुरू आहेत. उसाच्या लागणीमध्ये रासायनिक खतांचा बेसल डोस देऊन भर लावण्याची आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. तर पावसामुळे उशिरा लागण झालेल्या उसाची आंतरमशागतीची कामे करताना शेतकरी वर्ग दिसत आहे. २५ मेपर्यंत ही कामे चालतील, अशी अपेक्षा आहे.

नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर रिकामा झालेला कचरा गोळा करण्याचे काम करण्यासाठी बळिराजाला कुटुंबातील सर्व सदस्य मदत करताना पाहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या शेताची डागडुजी करण्याची कामेही चालू आहेत. खरीप हंगामात भुईमूग पिकांची नासधूस रानगवे, रानडुक्कर करतात. जास्त पावसात राखण करता येत नाही. त्यामुळे पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी हंगामात भुईमूग पिकांची लागवड केली जाते. खरीप हंगामापेक्षा जास्त उत्पादन मिळते व वन्य प्राण्यांपासून राखणही करता येते. सध्या उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकाचा कालावधी पूर्ण झाला असून भुईमूग काढणीस सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांची तारेवरची कसरत...

शेतातील कामे नियोजनाने करणे व पै-पाहुण्यांच्या लग्न, वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थिती, यामुळे शेतकरी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. या महिनाअखेरीस ही सर्व कामे पूर्ण करून पावसाचे आगमन झाले की, खरिपाच्या पेरण्या करण्यासाठी एकूण शेतकरी कामात व्यस्त असलेला पाहावयास मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT