Patients at Karad Sub-District Hospital Face Severe Water and Sanitation Crisis
Patients at Karad Sub-District Hospital Face Severe Water and Sanitation Crisis  Sakal
सातारा

Satara News : रुग्णांसाठी ना पाणी, ना स्वच्छता; कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात मोठी परवड, प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

हेमंत पवार

Satara News : कऱ्हाड (जि.सातारा) येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड, कडेगाव, वाळवा, शिराळा, खटाव, माण, खानापुर तालुक्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहे. त्यामुळे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र त्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही.

त्याचबरोबर त्यांना इतरही आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. रुग्णालयात सफाई कर्मचारीच नसल्याने तेथे मोठी गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी कचरा, धुळ साचत असुनही त्याची सफाई दररोज केली जात नसल्याने दुर्गंधीही परसत आहे. त्याचा फटका रुग्णांसह नातेवाईकांना बसत असुनही रुग्णालयाच्या प्रशासन मात्र गांधारीच्याच भूमिकेत आहे.

मुलभुत सेवाही मिळण्यासाठी कटकटी

रुग्णांसाठी पाणी, स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयात अनेकदा पाणीच मिळत नाही. त्यामुळे रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना विकत आणुन पाणी द्यावे लागत आहे.

त्याचबरोबर तेथील स्वच्छता केली जात नाही. परिणामी रुग्णांना दुर्गंधीतच सेवा घ्यावी लागते. सरकार आरोग्य विभागावर कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र त्यातुन मिळणाऱ्या सुविधाही नीट मिळत नाहीत. त्याचबरोबर सोयी मिळताना रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रुग्णांना बेडही मिळणेही मुश्कील

येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे १३८ बेडचे मोठे रुग्णालय आहे. मात्र रुग्णांची संख्या शेकड्यात आणि बेड हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे उपलब्ध बेडपैकी सर्व बेड दररोज भरलेले असतात. त्यामुळे नव्या येणाऱ्या रुग्णांना अॅडमीट व्हायचे असेल तर लगेच बेड उपलब्ध होतेच असे नाही. त्यामुळे त्यांना सातारच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते.

रिक्त पदामुळेही सेवेवर मर्यादा

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात वर्षानुवर्षे अनेक महत्वाची डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना मर्यादा येत आहेत. त्यासाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातुन मनोज माळी यांनी अनेकदा आंदोलन केले, उपोषण केले. त्यानंतर काही पदे मंजुर झाली. मात्र ती टिकली नाहीत. त्यानंतरही पहिले पाढे पंच्चावन्न अशीच स्थिती झाली आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी वाढतच चालल्या आहेत. त्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना आरोग्य विभागाचे. त्यात रुग्णांची मोठे हाल होत आहेत.

पालकमंत्र्यांनीच लक्ष देण्याची गरज

कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची घडी विस्कटली आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्याकडे प्रशासन आणि आरोग्य विभागानेही दुर्लक्षच केले आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे शासकीय रुग्णालयातुन चांगल्या आरोग्य सेवा मिळावी यासाठी आग्रही असतात. त्यांनीच आता कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीकडे लक्ष देवुन रुग्णांच्या सोय करावी, अशी मागणी होत आहे.

कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात मी स्वतः जावुन रुग्णांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे पाहिले आहे. त्यासारखे दुर्दैव नाही. त्याचबरोबर त्या परिसरात स्वच्छता ठेवली जात नाही. अनेक दिवस कचरा तसाच पडलेला असतो. रुग्णांना नीट उपचार मिळत नाहीत. उपजिल्हा रुग्णालय हे नावालच उरले आहे. त्याकडे आरोग्य विभागच्या वरिष्ठांनीच लक्ष द्यावे. अन्यथा लवकरच जनआंदोलन उभारणार आहोत.

- प्रमोद पाटील नागरीक, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT