सातारा

सातारा तालुक्‍यातील 150 सेवानिवृत्त शिक्षक फरकापासून वंचित

साहेबराव हाेळ

गोडोली (जि. सातारा) : सातारा तालुक्‍यातील जानेवारी 2016 ते एप्रिल 2019 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वेतन आयोगातील फरक अद्याप मिळालेला नाही. मात्र, सेवेत असणाऱ्यांची बिले वेळेत काढण्यात संबंधित कार्यालयाने तत्परता दाखवली आहे. परंतु, सेवानिवृत्तांनी हेलपाटे घालूनही त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. गेली दोन वर्षे गटशिक्षणाधिकारी मात्र निधीचे कारण सांगत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांत नाराजी पसरली आहे. त्यांनी तातडीने आजपर्यंत थकीत दोन हप्ते न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षकांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली. त्यात एक जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना नियमाप्रमाणे वेतनातील फरक समान पाच हप्त्यांत देण्याचे निश्‍चित झाले होते. त्याप्रमाणे सातारा पंचायत समितीने सुमारे 150 सेवानिवृत्त सेवकांचे विकल्प भरून घेतले. त्यात समान हप्त्यांत फरकाची बिले तयार केली. त्यानुसार पहिला हप्ता दोन जून 2019 रोजी, दुसरा हप्ता एक जून 2020 रोजी मिळणार होता. मात्र, आजअखेर एक दमडीही खात्यावर जमा झाली नाही. वास्तविक पाहता सेवानिवृत्तांना आजारपण, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह यांसारख्या गोष्टींना पैशाची गरज असते. सध्या अनेकांच्या खासगी नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. शेतीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण सुरू आहे. त्यातच वेतन आयोगाच्या फरकाची गरज असतानाही हातात पैसा मिळाला नाही. यासंदर्भाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी वरिष्ठांना भेटा असे सांगून मूळ प्रश्नाला बगल दिली. सेवेत असणाऱ्यांना लगेच पैसा दिला जातो. पण, सेवानिवृत्तांची सर्व स्तरावरून हेळसांड चालवली आहे. 

शिक्षक संघटनाही मूग गिळून गप्प! 

दरम्यान, शिक्षक संघटनाही या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत. फरकाची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित सेवकांनी दिला आहे. गेल्या दोन वर्षांत संबंधितांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून, संबंधितांचे नेमक्‍या कोणत्या अर्थपूर्ण बाबीकडे लक्ष असते, याचीही चौकशी व्हायला हवी असेही सेवकांचे मत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT