नगरपालिकेच्या ढिम्म कारभाराविरोधात शनिवारी धरणे आंदोलनास बसलेल्या महिला. sakal
सातारा

फलटण : फलटणला पाणीटंचाई विरोधात महिलांचे धरणे

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर नगरपालिकेसमोरील आंदोलन घेतले मागे

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर: फलटण नगरपालिकेकडून मेटकरी गल्लीत होत असलेल्या कृत्रिम पाणी टंचाईविरोधात वारंवार निवेदने देऊनही प्रशासन ढिम्मच राहिल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी व रमजान रोजेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील संतप्त महिलांनी फलटण नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन केले.

फलटण नगरपालिकेच्या नूतन इमारतीपासून केवळ काही फूट अंतरावर मेटकरी गल्लीत असलेल्या काही घरांना गेली चार वर्षे कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या कालावधीत संबंधितांनी अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. याप्रकरणी १५ दिवसांपूर्वी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची भेट घेत महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत गुढीपाडव्यादिवशीच आंदोलन करू, असा इशाराही दिला होता. तेव्हा रमजानच्या रोजेंच्या पार्श्वभूमीवर पाण्याची तक्रार येऊ देणार नाही, पाणीपुरवठा सुरळीत करू, अशी ग्वाही संजय गायकवाड यांनी दिल्याने हंड्यासह आलेल्या महिला मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन परत गेल्या होत्या; परंतु १५ दिवस उलटून गेल्यानंतरही तीच परिस्थिती राहिल्याने आज मुस्लिम महिलांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच रिकामे हंडे व भांडी घेऊन धरणे आंदोलनास प्रारंभ केला.

संतप्त महिलांनी ऐन पाडव्याच्या दिवशीच घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विनोद जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

Mughal History: सर्वात शक्तिशाली मुघल बादशहा होता समलैंगिक! तरण्याबांड पोराच्या प्रेमाखातर बायकोलाही सोडून दिलेलं

SCROLL FOR NEXT