सातारा

दिव्यांगांच्या लसीकरणास आरोग्य विभागाचा ठेंगा?

प्रशांत घाडगे

सातारा : देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांपुढील इतर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणाच्या तीनही टप्प्यांत दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत अनेक स्वयंसेवी संस्थांनी पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्यापही दिव्यांग संस्थांच्या मागण्यांकडे शासनाने कानाडोळा केला आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत होता. अचानक फैलावलेल्या या आजाराची लस उपलब्ध होण्यासाठी जानेवारी महिना आला. सातारा जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात झाली. मात्र, या लसीकरणात तीन टप्प्यांत सर्व घटकांतील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. परंतु, या लसीकरण मोहिमेत दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची आकडेवारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आशा भवन, इतर सामाजिक सस्था, वृध्दाश्रम, दिव्यांग संस्था आदींच्या तपासणीस सुरुवात केली. या दरम्यान अनेक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहून दिव्यांग, अपंग, निराधार व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्‍यकता आहे. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त नागरिकांना लस दिली जात असताना शासनाने दिव्यांग व्यक्तींना का वगळले? असाही प्रश्‍न अनेक दिव्यांग संस्था, संघटनांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी दिली. 

जिल्ह्यात सुमारे 17 हजार दिव्यांग 

सातारा जिल्ह्यात सुमारे 40 दिव्यांग संस्था असून, सुमारे 17 ते 18 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. यामधील कोणत्याही संस्थेत शासनाच्या वतीने अद्याप लसीकरण झाले नाही. यामध्ये सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्ती असल्याने या सर्वांना लवकरात-लवकर कोविडची लस देणे आवश्‍यक असल्याचे, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने सांगितले आहे. 

""जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. कोरोना लसीकरणाच्या काळात सर्व घटकांना सामावून घेतलेले असताना दिव्यांग व्यक्तींना वगळले आहे. त्यामुळे दिव्यांग, अपंग निराधार व्यक्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या व्यक्तींच्या लसीकरणासाठी या आधी दोन वेळा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाशी चर्चा केली आहे. मात्र, त्यांनी केवळ पुढील काही दिवसांत निर्णय घेतो, असे सांगत चालढकल केली.'' 

-अजय पवार, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Pune Crime: पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग अन् अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

SCROLL FOR NEXT