सातारा

सातारा : लग्न लावून देतो सांगून दोघांनी महिलेस लुबाडले

उमेश बांबरे

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून एका 50 वर्षीय महिलेकडून एक लाख रुपये घेऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी शंकर खरात, संकेत लोखंडे (दोघे रा. पिरवाडी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित महिला व संशयितांची 2013 मध्ये ओळख झाली. संबंधित पीडित महिला एकटीच राहात आहे. ती स्वतःच्या लग्नासाठी स्थळ शोधत होती. याची माहिती या दोघा संशयितांना मिळाल्यानंतर त्यांनी महिलेशी ओळख वाढवली. आम्ही तुमचे लग्न लावून देतो, यासाठी एक लाख रुपये खर्च येईल, असे त्यांनी या महिलेला सांगितले.

पीडित महिलेने एक लाखाची रक्कम संशयितांना दिली. पैसे दिल्यानंतर संशयित दोघे रात्री उशिरा महिलेच्या घरी गेले. लग्नासाठी फोटो पाहिजे, असे सांगून त्यांनी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संबंधित पीडित महिला घाबरली. संशयितांनी धमकी देऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 2013 मध्ये घडली असून, असा प्रकार वारंवार होऊ लागल्यानंतर पीडित महिलेने गुरुवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT