सातारा

कऱ्हाडच्या बेफिकीर 300 नागरिकांना पोलिसांचा झटका!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) :  मास्क न वापरण्यासह सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी शहरात 300 जणांवर कारवाई करत प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे तब्बल एक लाख 45 हजारांच्या दंडाचीही वसुली केली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.
 
शहर पोलिसांनी कालपासून मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी 83 जणांवर कारवाई झाली. त्यात 41 हजार 500, तर काल (रविवारी) दिवसभरात 97 हजार 500 रुपये दंडाची आकारणी केली. शहरात वेगवेगळ्या पथकाद्वारे चार ते पाच ठिकाणांवर कारवाईसाठी पथक तैनात होते. 

त्यात कोल्हापूर नाका, कृष्णा कॅनॉल चौक, कार्वे नाका, चावडी चौक, मुख्य बाजारपेठेत कारवाई झाली. 70 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल, तर 13 जणांवर सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल 41 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. कालही 195 जणांवर कारवाई झाली. त्यात 97 हजार 500 रुपयांच्या दंडाची आकारणीही केली आहे. शहर पोलिसांनी 110, तर वाहतूक पोलिसांनी 103 जणांवर कारवाई केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT