Police Action esakal
सातारा

विसापुरात पोलिसांची धडक कारवाई; जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा

विसापुरातील रणपिसेवस्ती शेजारी नऊ जण तीनपानी पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ऋषिकेश पवार

विसापूर (सातारा) : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उलंघन करून स्वतः मास्कचा वापर न करता एकत्र येऊन तीनपानी पत्त्याचा जुगार खेळताना विसापूर (ता. खटाव) येथे नऊ जण मिळून आले. पुसेगाव पोलिसांनी (Police Action) त्यांच्यावर कारवाई करून संबंधित नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Police Action Against Nine Persons In Visapur Satara News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल विसापूर येथील रणपिसेवस्ती शेजारी नऊ जण तीनपानी पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून छापा टाकला. या वेळी संबंधित नऊ जणांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, तीन मोबाईल व एक मोटारसायकल असा 43 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे एकूण चार हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलिस नाईक माने, हवालदार जाधव, मुल्ला, चव्हाण, जगताप यांनी केली आहे.

Police Action Against Nine Persons In Visapur Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

SCROLL FOR NEXT