सातारा : जिल्ह्यात पोलिस दलामार्फत ई-चलन प्रणालीव्दारे कारवाई सुरु आहे. सदरची कारवाई करीत असताना गाडीच्या चुकीच्या नंबरप्लेटबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, उप विभागीय पोलिस अधिकारी, वाहतूक नियंत्रण शाखेचे संदीप भागवत यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहिमद्वारे सातारा शहरात वाहन MH-11-CC-8887 हा चुकीचा नंबर लावून दोन वाहन चालक गाडी वापरत असल्याचे आढळून आले.
हा नंबर आर.टी.ओ. ऑफिसकडील नोंदीनुसार अन्य गाडीचा आहे. सदरची गाडी ही श्रीधर रामदास जगदाळे रा. कुमठे, ता. कोरेगाव यांच्या मालकीची असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या गाडीवर दंडाची आकारणी होत असल्याची तक्रार केलेली आहे. चुकीचा नंबर लावून वाहनांचा वापर केल्याप्रकरणी वाहन चालक अनिल कस्तुरे रा. करंजे ता. जि. सातारा याच्या विरोधात पोलिस हवालदार शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे, तसेच वाहन चालक राहुल चंद्रकांत माने, मालक निशिकांत सुनिल पिसाळ दोघे रा. रघुनाथपुरा पेठ करंजे, सातारा यांच्या विरोधात पोलिस नाईक अरुण पाटील यांनी तक्रार दिल्याने सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच जिल्ह्यांच्या एसपींना साताऱ्यात आयजींचा कानमंत्र!
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शेलार, अनिल धनवडे, दशरथ कदम, सुरेश शिंदे, विजय शिंगटे, अरुण पाटील, मनोज मदने, संदीप वाघमारे, आनंदराव भोसले यांच्या पथकाने केली आहे. वाहन चालकांकडून वाहनांस फॅन्सी नंबरप्लेट, तसेच विहीत नमुन्यातील नंबरप्लेट न लावण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून ई-चलन मशीनव्दारे कारवाई करीत असताना गाडीच्या नंबरचे आकलन व्यवस्थित होत नसल्याने दुसऱ्यांच्या गाडीवर कारवाई होवू लागली आहे. वाहनांच्या नंबरप्लेटबाबत वाहनधारकांनी सजग होणे आवश्यक आहे. यापुढे विहीत नमुन्यामध्ये नंबर नसणा-या, तसेच चुकीचा नंबर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहीम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. ए. शेलार यांनी केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.