सातारा

गुरुवार पेठेत ACB चा छापा; दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

गिरीश चव्हाण

सातारा : पुनर्वसनाचा तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तासगाव (ता. सातारा) येथील मंडलाधिकारी संतोष शिवाजी झनकर याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री सातारा येथील शकुनी गणेश मंदिराच्या पाठीमागील मैदानात पकडले. झनकर याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्याचे काम एसीबी आणि सातारा शहर पोलिस करत होते.
 
याबाबत माहिती अशी, की तासगाव (ता. सातारा) येथे कार्यरत असणारा मंडलाधिकारी संतोष शिवाजी झनकर (रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्याकडे पुनर्वसनाच्या अनुषंगाने एक अर्ज आला होता. तो अर्ज निकाली काढावा म्हणून तक्रारदार सातत्याने प्रयत्न करत होता. मात्र, झनकर कार्यवाही करत नव्हता. दहा हजार रुपये लाच देण्याचे मान्य केल्यानंतर झनकर अर्ज निकाली काढण्यास तयार झाला.

याची तक्रार नोंद केल्यानंतर त्याची शहानिशा करून झनकरला पकडण्यासाठी आज सायंकाळी शकुनी गणेश मंदिराजवळ सापळा रचण्यात आला. या सापळ्यावेळी झनकर याला दहा हजार रुपये घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी करण्याचे काम सुरू होते. 

आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला; ढेबेवाडी आरोग्यत 14 वर्षांनंतरही सुविधांची वानवाच!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT