सातारा

वेश्‍या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांची पोलिसांनी केली सुटका

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : शहरातील मध्यवस्तीतील तृप्ती लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्‍या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली. त्यांना कऱ्हाड येथील आशा किरण सुधारगृहामध्ये पाठविण्यात आले. याप्रकरणी मॅनेजर बसराज मानिक मान्याळ (वय 43, रा. बोधेवाडी, ता. कोरेगाव), महिला पुरविणारा नवनाथ ऊर्फ पप्या अनिल जाधव (वय 27, रा. बावधन, ता. वाई) या दोघांसह लॉजच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील तृप्ती लॉजवर वेश्‍या व्यवसायासाठी मुली व महिला पुरविल्या जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी बोगस ग्राहक पाठवून लॉजवर छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन महिला आणून ठेवल्याचे दिसून आले.

सामान्यांची कामे हाेत नसल्याने तहसीलदारांवर शिवसैनिक नाराज 

या महिलांना ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविण्यात आले असून, लॉजचा चालक, मालक व महिला पुरविणार अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, श्रावण राठोड, किरण निंबाळकर, अक्षय नेवसे, महिला पोलिस दीपिका निकम, सोनाली माने यांनी सहभाग घेतला. अधिक तपास उपनिरीक्षक संजय मोतेकर करीत आहेत.

परदेशातून आलेल्या सातारकरांचा आराेग्य विभागास दिलासा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT