सातारा

अकरा वर्ष झाली कऱ्हाड पालिकेचा पोलिसांच्या पत्रावर निर्णयच नाही

सचिन शिंदे

कऱ्हाड : शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती लक्षात घेऊन शहरातील तीन रस्त्यांवर एकेरी (वन वे) करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पालिकेला त्याचा सोयीस्कररित्या विसर पडल्याने पोलिसांनी संपर्क साधूनही त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. पालिकेला पोलिसांनी लेखी पत्रही दिले आहे. मात्र, त्यावर पालिकेने काहीच निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीचे तीन व आत्ताचे तीन असे रस्ते वन वे होण्याची गरज आहे.
 
कृष्णा घाटालगत सोमवार पेठेत जाणारा रस्ता केवळ सोमवार पेठेत जाण्यासाठी, सोमवार पेठेतून बाहेर पडण्यासाठी रॉयल कॉम्पलेक्‍सजवळचा रस्ता ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही रस्ते वन वे असतील. त्याशिवाय कन्याशाळा, शुक्रवार पेठ येथील रस्ताही एकेरी करण्याचा पोलिसांचा पालिकेला प्रस्ताव आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वन वेची गरज लक्षात घेऊन वरील तिन्ही रस्ते वन वे करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर काेणते नियम लागू आहेत वाचा सविस्तर, काेणाला वाढीव वेळ मिळाली आहे वाचा सविस्तर 

पोलिसांनी 2009 पासून केलेल्या वाहतूक आराखड्यात तीन ठिकाणचे रस्ते एकेरी वाहतुकीसाठी करावेत, अशी मागणी आहे. त्याकडे पालिका सोयीस्करित्या दुर्लक्ष करत आहेत. त्यात आता पुन्हा तीन रस्त्यांना वन वेची गरज असल्याचे पत्र पोलिसांनी दिले आहे. त्याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT