सातारा

दहिवडीतील तरुणांमुळे पोलिसांनी खटाव तालुक्यातील चोरट्यास पकडले

रुपेश कदम

दहिवडी (जि.सातारा) : एका आजीला भुलवून गुन्हा करण्याच्या हेतूने आलेल्या संशयित चोरट्यास तरुणांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात पकडण्यात दहिवडी पोलिसांना यश आले. शनिवारी सायंकाळी एक मध्यमवयीन पुरुष दुचाकीवरुन भवानवाडी परिसरात आला. एका घराच्या जवळ वयस्कर महिलेशी बोलून पाहुण्यारावळ्यांची चौकशी केली. नंतर मी तुमचा पाहुणाच आहे, अशी बतावणी त्याने केली. आजी त्याच्या बोलण्याला भुलल्या व त्याला घरी चहा पिण्यास बोलवले. घरात असलेल्या वयस्कर मंडळींना त्याने आपल्या बोलण्याने भुलवून विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी राजू मुळीक हे त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या संशयिताची चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो गडबडून गेला. काही वेळातच त्याने काढता पाय घेतला. मात्र, त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलीस केतन बर्गे यांच्या सहाय्याने राजू मुळीक, पाडुरंग सत्रे, स्वप्नील मुळीक व आशिष मुळीक यांनी त्याचा पाठलाग करुन त्याच्या दुचाकीला स्वतःच्या दुचाकी आडव्या लावून त्याला फलटण रस्त्यावर पकडले.
 
त्यानंतर संशयितास दहिवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी अधिक चौकशी केली असता त्याचे नाव बंडू विठ्ठल बिटले (वय 45) असल्याचे व गाव बिटलेवाडी (ता. खटाव) असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याजवळ असलेली दुचाकी (एम. एच. 11 बी. क्‍यू. 4614) चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्या संदर्भातील गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्यामुळे या संशयितास पुसेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दहिवडीतील सतर्क तरुणांमुळे एका चोरट्यास पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. त्यामुळे या तरुणांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

पाऊस आला की चुकतोय काळजाचा ठोका, जमीन खचणारी गावे उपायांविनाच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT