Satara Bank Election esakal
सातारा

काँग्रेस, शिवसेना देणार दुसरा पर्याय

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) राष्ट्रवादीकडून (NCP) अद्याप रणनीती ठरली नसल्याचे सांगितले जात आहे. विविध सोसायटी गटातून दाखल झालेल्या ठरावांनुसार कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, माण या सोसायटी गटातून विद्यमान संचालकांविरोधात इच्छुकांचे ठराव असल्याने या ठिकाणी निवडणूक लागू शकते. भाजपच्या पॅनेलविषयी (BJP Panel) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंपर्यंत (MLA Shivendrasinharaje Bhosale) कोणीही चर्चेला पोचलेले नाही. राष्ट्रवादीने सर्वांशी जुळवून न घेतल्यास काँग्रेस (Congress) व शिवसेना (Shiv Sena) एकत्रित पॅनेल करण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून (NCP) अद्याप रणनीती ठरली नसल्याचे सांगितले जात आहे.

या बॅंकेची निवडणूक सर्वपक्षियांना सामावून घेऊन बिनविरोध करण्याबाबतचे प्रयत्न काही नेत्यांचे सुरू असले, तरी अद्याप तरी त्या विषयी कोणतीही बैठक अथवा चर्चा झालेली नाही. बॅंकेच्या निवडणुकीचे ठराव कोल्हापूरच्या सहनिबंधकांकडे पाठविण्यात आले आहेत. या ठरावावरून शुक्रवारी (ता. ३) कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आजपर्यंत सोसायटी मतदारसंघाच्या सहा जागा बिनविरोध होत होत्या. मात्र, यावेळेस यातील केवळ तीन चार जागाच बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी विद्यमान संचालकांसोबत इतरांचेही ठराव आलेले आहेत. त्यामुळे कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव या सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लागू शकते.

आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांचे १२ ठराव जिल्हा बॅंकेने रद्द केले आहेत. त्यामुळे कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते कोणती भूमिका घेणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. माण सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक ठराव आमदार जयकुमार गोरे यांचे, तर त्यानंतर शिवसेनेचे नेते शेखर गोरे व सर्वात कमी ठराव राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच आमदार गोरे आपले पत्ते ओपन करणार, हे निश्चित आहे. पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यात लढत आहे. मंत्री देसाई स्वत: रिंगणात उतरणार की त्यांचा प्रतिनिधी यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. कऱ्हाडमधून पालकमंत्री बाळासाहेब पाटील व ॲड. उदयसिंह पाटील यांचे ठराव आहेत. भाजपचेही काही ठराव आहेत. ते कोणाच्या पारड्यात पडणार हेही महत्त्वाचे आहे.

जावळीतून आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांचे ठराव आहेत. वाईतून मकरंद पाटील, नितीन पाटील यांचे ठराव असून भाजपचे नेते मदन भोसले यांच्याकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव, खंडाळा मतदारसंघातून विद्यमान संचालकांच्या नावाने ठराव आहेत; पण त्यांच्याविरोधात सक्षम विरोधकांचे ठराव नसल्याने या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीविरोधात भाजपचे पॅनेल होईल, अशी चर्चा होती; पण अद्यापपर्यंत तरी सर्वाधिक मते असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यापर्यंत भाजपचे कोणीही नेते चर्चेसाठी पोचलेले नाही. त्यामुळे भाजपकडून पॅनेलची बांधणी होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवसेनेने जिल्हा बॅंकेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने सामावून घेऊन काही जागा दिल्या तर ठिक अन्यथा काँग्रेस व इतरांना सोबत घेऊन शिवसेना दुसरा पर्याय उभा करण्याची शक्यता आहे.

जावळी सोसायटीतून आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचे ठराव झालेले आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदेंपुढे अडचण निर्माण झाली आहे. आजपर्यंत जावळी तालुक्याने आमदार शिंदेंना साथ दिली आहे; पण यावेळेस त्यांच्याविरोधात उमेदवार असणार आहे. जिल्हा बॅंकेच्या नोकर भरतीत आमदार शिंदेंकडून कोरेगावातील लोकांचा विचार केला जात असल्याने जावळीकरांत नाराजी असल्याचे बोलले जाते. शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्या समर्थकाला काय सूचना करणार यावर या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT