Shambhuraj Desai esakal
सातारा

पोलिसांचं प्रामाणिकच काम, चित्रा वाघांनी बिनबुडाचे आरोप थांबवावेत

प्रशांत घाडगे

चित्रा वाघ या बेजबाबदार वक्तव्य करत असून, त्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेतली पाहिजे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील पोलिस प्रामाणिकपणे काम करत आहेत. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे आरोप बिनबुडाचे असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे त्या बेताल वक्तव्य करत आहेत. प्रत्येक घटनेची शहानिशा करूनच त्यांनी आरोप करावेत, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांच्याच जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याची टीका दोन दिवसांपूर्वी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली होती. श्री. देसाई यांनी त्याला प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावत घटनेतील संशयितांना अटक केल्याचे सांगितले. श्री. देसाई म्हणाले, ‘‘चित्रा वाघ यांना जिल्ह्यात घडलेल्या घटनांची पुरेशी माहिती नसून त्यांनी सविस्तर माहिती घेऊन बोलावे. मागील काही दिवसांत चाफळ, तांबवे, महाबळेश्‍वर, झिरपवाडी येथे झालेल्या घटनेतील एकूण सात जणांनादेखील अटक करण्यात आलीय. तसेच, तांबवे येथील प्रकरणात कुटुंबीयांची भेट घेतली असून संशयितांना कडक शासन करण्यात येईल. या प्रकरणात कुटुंबीयांना तातडीची मदतही करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील एका घटनेत गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. चाफळमधील चाकू हल्‍ल्यातील सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.’’

दरम्यान, चित्रा वाघ या बेजबाबदार वक्तव्य करत असून, त्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेतली पाहिजे. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे आरोप करत असून, त्यांनी प्रत्येक प्रकरणाची माहिती घ्यावी. राज्यभरात कुठेही महिलांवर अत्याचार झाल्यास तत्काळ कारवाई केली जात असल्याने वाघ यांनी बेताल वक्तव्य करणे सोडून द्यावे, असा सल्लाही श्री. देसाई यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT