सातारा

MSEB विरोधात शाही मस्जिद परिसरातील व्यापारी आक्रमक

गिरीश चव्हाण

सातारा : थकीत वीजबिल भरण्यास मुदत देण्याऐवजी भल्या सकाळी वीज जोडणी तोडल्याने संतप्त झालेल्या साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी वीज वितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या व्यापाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शटर बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
येथील व्यापाऱ्यांना थकीत वीजबिल भरणा करण्यासाठीच्या नोटिसा वीज वितरणकडून बजावण्यात आल्या होत्या. कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे व्यवसाय चक्र थंडावल्याने पहिल्या टप्प्यात 30 टक्के बिले भरून घेत उर्वरित रकमेसाठी मुदत देण्याची मागणी काही व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. निवेदन देऊन काही दिवस झाले असतानाच बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी शाही मशिद परिसरातील काही व्यापाऱ्यांचा वीजपुरवठा तोडला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर वीजपुरवठा तोडण्यात आल्याचे त्या व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. याबाबत साताऱ्यातील व्यावसायिक सागर भोसले यांनी वीज वितरणने व्यापाऱ्यांची 30 टक्के बिले भरून घेत उर्वरित बिलांसाठी मुदत देण्याची, तसेच तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मागणीचा विचार करत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी शटर बंद आंदोलन करतील, असा इशारा दिला. 
 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT